३१ शाळांच्या निर्लेखनास पं.स.ची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:31 AM2021-03-09T04:31:13+5:302021-03-09T04:31:13+5:30
नागभीड तालुक्यात १० केंद्र आहेत. या ३१ वर्गखोल्या १० केंद्रातील आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गिरगाव, सावरगाव, सोनुली (कन्हा), नांदेड, सावंगी ...
नागभीड तालुक्यात १० केंद्र आहेत. या ३१ वर्गखोल्या १० केंद्रातील आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गिरगाव, सावरगाव, सोनुली (कन्हा), नांदेड, सावंगी बडगे, सोनुली बुज, वलनी, तळोधी, गोविंदपूर केंद्रातील कोजबी माल, धामणगाव चक, धामणगाव माल, किटाळी केंद्रातील चिंधी चक, मांगरुड,नागभीड केंद्रातील सुलेझरी, तुकूम, नवखळा, भिकेश्वर, मांगली केंद्रातील पेंढरी, मोहाळी, डोंगरगाव बाळापूर केंद्रातील उश्राळ मेंढा, सोनुली खुर्द, मिंडाळा केंद्रातील कोदेपार, राजुली, गोवारपेठ, कोसंबी गवळी, मिंडाळा कोर्धा केंद्रातील खाडकी, किरमिटी, मेंढा (कि) आणि म्हसली केंद्रातील विलम या शाळांचा समावेश आहे.
बॉक्स
अशी आहे प्रक्रिया
पंचायत समिती आता हा निर्लेखनाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवेल. त्यानंतर जिल्हा परिषद जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठेवील. सर्वसाधारण सभेने या निर्लेखनास मान्यता दिल्यानंतर हा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे जाईल. त्यानंतर हे वरिष्ठ कार्यालय या इमारती खरोखरच जीर्ण झाल्या आहेत का, याची तपासणी करण्यासाठी आपल्या कनिष्ठ कार्यालयाच्या प्रतिनिधीस पाठवेल आणि तपासणीसाठी आलेले प्रतिनिधी तपासणी करून आपला अहवाल आपल्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवेल. या वरिष्ठ कार्यालयाने आपली मोहोर उमटविल्यानंतर परत या प्रस्तावाचा उलट प्रवास सुरू होत असल्याची माहिती आहे.