लोकहभागातून दारूबंदी शक्य -नियती ठाकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 11:05 PM2017-08-23T23:05:12+5:302017-08-23T23:05:40+5:30

दारुबंदीसाठी पोलीस प्रशासनाने कठोर पाऊले उचलली असून गुन्हेगारीला पायबंध घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Poetry possible from the public - Nitai Thakar | लोकहभागातून दारूबंदी शक्य -नियती ठाकर

लोकहभागातून दारूबंदी शक्य -नियती ठाकर

Next
ठळक मुद्देमूूल येथे पार पडली बैठक : गावातील पुढाºयांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : दारुबंदीसाठी पोलीस प्रशासनाने कठोर पाऊले उचलली असून गुन्हेगारीला पायबंध घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. दारुबंदी ही केवळ पोलिसांची जवाबदारी नसून जनतेचे सहकार्य देखील महत्त्वाचे आहे. गणेशोत्सव व ईद या सणाचे औचित्य साधून जिल्ह्यात जवळपास १०० तडीपारीचे प्रस्ताव पाठविण्यात आले असून जिल्ह्यात शांततेत उत्सव साजरे व्हावे, ही आपली भूमिका असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी केले.
मूल येथील एका खासगी मंगल कार्यालयात आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराज राजपूत, नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, उपाध्यक्ष नंदू रणदिवे, पं.स. सभापती पूजा डोहणे, उपविभागीय अधिकारी राजेश सरवदे, नायब तहसीलदार पी. व्ही. कोमलवार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, बाजार समितीचे सभापती घनश्याम येनुरकर, माजी सभापती संजय मारकवार आदी उपस्थित होते.
यावेळी पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी जिल्ह्यात ४० कोटींची दारु मुद्देमालासह जप्त झाली असून निव्वळ दारु २० कोटी रुपयांची आहे. दारुबंदी ते व्यसनमुक्ती हे प्रबोधनात्मक काम करण्याचा प्रयत्न असणार आहे. दारुबंदीसाठी पोलीस प्रशासनाबरोबरच राज्य उत्पादक शुल्क, गावातील लोकप्रतिनिधीची देखील तेवढीच जबाबदारी असल्याचे सांगितले.
याप्रसंगी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, उपविभागीय अधिकारी राजेश सरवदे, प्रा. चंद्रकांत मनियार, प्राचार्य अजाबराव वानखेडे यांनी मत व्यक्त केले. प्राचार्य वानखेडे यांनी गणेश उत्सवात चिनी मालावर बहिष्कार टाकून स्वदेशी माल खरेदी करण्याचे आवाहन केले. गावात शांतता राहावी यासाठी न्यायालयात ठरवून दिलेल्या आदेशाचे पालन काटेकोरपणे करण्याचे आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल हिरे यांनी प्रास्ताविकातून केले.
कार्यक्रमाचे संचालन मूल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पडोळे तर उपस्थितांचे आभार पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांनी मानले. याप्रसंगी मूल पोलीस उपविभागाअंतर्गत येणाºया मूल, सावली, पोंभुर्णा, सिंदेवाही, पाथरी येथील पोलीस प्रमुख, पोलीस पाटील मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, मूलचे न.प. पदाधिकारी, नगरसेवक, व्यापारी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

Web Title: Poetry possible from the public - Nitai Thakar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.