इमारतीसारखे पोलिसांनीही स्मार्ट व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 09:23 PM2018-12-31T21:23:29+5:302018-12-31T21:23:47+5:30
भद्रावती पोलीस ठाण्याची भव्यदिव्य इमारत बनली आहे. आकर्षक आणि सुंदर, सुसज्ज पोलीस स्टेशनची इमारत जनतेच्या सेवेत रुजू झाली आहे. यातून लोकांच्या तक्रारींचा यथाशीघ्र निपटारा व्हावा, स्मार्ट इमारतीसारखे पोलिसांनीही स्मार्ट बनून कामे करावी, अशी अपेक्षा राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : भद्रावती पोलीस ठाण्याची भव्यदिव्य इमारत बनली आहे. आकर्षक आणि सुंदर, सुसज्ज पोलीस स्टेशनची इमारत जनतेच्या सेवेत रुजू झाली आहे. यातून लोकांच्या तक्रारींचा यथाशीघ्र निपटारा व्हावा, स्मार्ट इमारतीसारखे पोलिसांनीही स्मार्ट बनून कामे करावी, अशी अपेक्षा राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी होते. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष अनिल धानोरकर, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप पवार, नरेंद्र जीवतोडे, पोलीस निरीक्षक बी. डी. मडावी आदी मंचावर उपस्थित होते.
पोलीस स्टेशन भद्रावती नवनिर्मित प्रशासकीय इमारत व निवासी इमारतीचे उद्घाटन सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते म्हणाले, सत्तेवर आल्यानंतर चार वर्षांपूर्वी प्रथम प्रशासकीय इमारती कशा सुंदर बनविता येईल, याकडे लक्ष केंद्रीत केले व संपूर्ण महाराष्टÑातील पोलीस स्टेशन स्मार्ट बनविण्याकरिता लक्ष केंद्रीत केले. चिमूर, बल्लारपूर, मूलनंतर भद्रावतीत स्मार्ट पोलीस स्टेशनची निर्मिती केली. या स्मार्ट पोलीस स्टेशनबरोबरच येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीसुद्धा स्मार्ट बनूनच कामे करायला हवी, असे ते म्हणाले. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनीही मनोगत व्यक्त केले.
पालकमंत्र्यांचे आभार
सुंदर भद्रावती शहरात सुंदर पोलीस स्टेशन निर्माण करण्यात आल्याने या शहराच्या वैभवामध्ये मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याचप्रमाणे डोलारा तलाव सौंदर्यीकरणाकरिता विशेष निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी यावेळी पालकमंत्र्यांचे आभार मानले. शहरातील सीसीटीव्ही बंद असल्याने स्मार्ट पोलीस स्टेशनप्रमाणे चांगल्या दर्जाच्या कॅमेºयासाठी पालकमंत्र्यांनी निधी द्यावा, अशी मागणीसुद्धा केली.