महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 10:56 PM2019-02-01T22:56:57+5:302019-02-01T22:57:11+5:30
महिलांवर अत्याचार होऊ नये. यासाठी कायदा व सुव्यवस्थेची यंत्रणा सक्षम केली जात आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत पोलीस सारथी या माध्यमातून जिल्ह्यात रात्री १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत मदत देण्याची यंत्रणा जिल्ह्यात उभी झाली. असून पोलीस प्रशासन याकरिता कटीबद्ध आहेत, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले. पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने गोंडपिपरी ठाण्याअंतर्गत भंगाराम तळोधी येथे मोफत रोगनिदान शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वढोली : महिलांवर अत्याचार होऊ नये. यासाठी कायदा व सुव्यवस्थेची यंत्रणा सक्षम केली जात आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत पोलीस सारथी या माध्यमातून जिल्ह्यात रात्री १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत मदत देण्याची यंत्रणा जिल्ह्यात उभी झाली. असून पोलीस प्रशासन याकरिता कटीबद्ध आहेत, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले. पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने गोंडपिपरी ठाण्याअंतर्गत भंगाराम तळोधी येथे मोफत रोगनिदान शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक कामत, पोलीस उपविभागीय अधिकारी शेखर देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पेंदाम, ठाणेदार प्रवीण बोरकुटे, डॉ. धुर्वे, जिल्हा परिषद सदस्य वैष्णवी बोडलावार विलास माडुरवार व अन्य मान्यवर उपस्थित होते. पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी म्हणाले, नियंत्रण कक्षाद्वारे महिलांकरिता १०९१ हेल्पलाइन, ९४०४८७२१०० व्हाट्सअॅपवर संपर्क साधल्यास संकटात सापडलेल्या महिलांना पोलीस वाहनाने त्यांच्या घरी सोडून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात अशा प्रकारची यंत्रणा सज्ज करण्यात आली.
आरोग्य शिबिरात सांधेदुखी, अस्थिविकार, मधुमेह, हृदयरोग, स्थूलपणा, श्वसनाचे विकार, किडनीचे आजार अशा विविध आजारांची विनामूल्य तपासणी व उपचार करण्यात आली. गोंडपिपरी तालुक्यातील १ हजार ६०० रूग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. १०० नेत्र रूग्णांची नेत्र तपासून चष्म्यांचे वाटप करण्यात आले. मोठा आजार असलेल्या रूग्णांना अन्य शिबिरांमध्ये तपासणी केली जाईल. पुढील उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी आरोग्य व पोलीस प्रशासनाकडून मोफत सुविधा पुरविण्यात येणार आहे, अशी माहिती ठाणेदार प्रवीण बोरकुटे यांनी दिली. सत्यवान सुरपाम, बिके तसेच आरोग्य, पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी शिबिरासाठी सहकार्य केले.