पोलिसांना मिळाली अत्याधुनिक व्यायामशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 11:21 PM2018-01-27T23:21:31+5:302018-01-27T23:21:58+5:30

सुदृढ शरीरात उत्तम मन वास करते. पोलिसांना उत्तम, निरामय आरोग्य आवश्यक आहे. समाजात मनभेद निर्माण करणाऱ्यांना वठणीवर आणण्याचे काम पोलीस कर्मचारी करतात.

Police got the state-of-the-art gymnasium | पोलिसांना मिळाली अत्याधुनिक व्यायामशाळा

पोलिसांना मिळाली अत्याधुनिक व्यायामशाळा

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : पोलीस कल्याणासाठी शासन भक्कमपणे पोलिसांच्या पाठीशी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सुदृढ शरीरात उत्तम मन वास करते. पोलिसांना उत्तम, निरामय आरोग्य आवश्यक आहे. समाजात मनभेद निर्माण करणाऱ्यांना वठणीवर आणण्याचे काम पोलीस कर्मचारी करतात. पोलीस कल्याणशी संबंधित नस्ती कधी आली व ती निगेटीव्ह असली तर ती मी पॉझिटीव्ह करतो. सायबर क्राईम लॅब प्रथमत: चंद्रपुरात सुरू झाली. २०१५ मध्ये ही सुरूवात करणारा चंद्रपूर हा पहिला जिल्हा ठरला. पोलीस भरतीमध्ये जिल्हयाचे प्रमाण अधिक वाढावे, यासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्र, पोलिसांसाठी निवासस्थाने तयार करीत आहोत. निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरे देण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन आणि वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पोलिस कल्याणासाठी शासन पोलिसांच्या पाठिशी भक्कमपणे उभे असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
चंद्रपूरात १.३६ कोटी खर्चून बांधण्यात आलेल्या पोलीस जीमचे लोकार्पण ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून आ. नाना शामकुळे, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, पोलीस अधीक्षक नियती ठाकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर उपस्थित होते.
ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, पोलीस दल अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आम्ही जिल्हयात १०२ कोटी रुपये खर्च करून पोलिसांसाठी क्वॉर्टरचे बांधकाम केले. बल्लारपूर येथे १० कोटी रूपये निधी खर्चून नव्या पोलिस स्टेशनचे बांधकाम, दुगार्पूर येथे नवीन पोलीस स्टेशनचे बांधकाम करीत आहोत. राज्यात काहीच ठिकाणी असणारी सीसीटिव्ही मोबाईल व्हॅन चंद्रपूरात आपण घेतली. पोलिसांना सुविधा देण्याबाबत हात आखडता घेणार नाही. जिल्हा दारुबंदी करताना जिल्ह्याच्या सदृढ आरोग्याचाच आम्ही विचार केला होता. पोलिसांनी या घोषणेला उत्तम प्रतिसाद दिला असून जिल्हा व्यसनमुक्त करण्याच्या प्रक्रियेमध्ये योगदान देण्याचे आवाहनही ना. मुनगंटीवार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी केले. या जीमच्या माध्यमातून पोलिसांच्या आरोग्याला आकार देण्याचे काम होणार असल्याचे नियती ठाकर म्हणाल्या. अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराज राजपुत यांनीही मनोगत व्यक्त केले. संचालन व आभार सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक विकास मुंडे यांनी केले. जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

Web Title: Police got the state-of-the-art gymnasium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.