पोलिसांचे काम आरोपींमध्ये धाक कायम राहील असे हवे

By admin | Published: October 13, 2016 02:19 AM2016-10-13T02:19:52+5:302016-10-13T02:19:52+5:30

आरोपींवरील दोष सिध्दीचे प्रमाण पूर्वी केवळ १० टक्के होते. गेल्या दोन वर्षात हे प्रमाण ५१ टक्यांवर पोहोचले आहे.

Police officers should be afraid of the accused | पोलिसांचे काम आरोपींमध्ये धाक कायम राहील असे हवे

पोलिसांचे काम आरोपींमध्ये धाक कायम राहील असे हवे

Next

सुधीर मुनगंटीवार : बल्लारपूर पोलीस ठाणे इमारतीचे भूमिपूजन
चंद्रपूर : आरोपींवरील दोष सिध्दीचे प्रमाण पूर्वी केवळ १० टक्के होते. गेल्या दोन वर्षात हे प्रमाण ५१ टक्यांवर पोहोचले आहे. एकही आरोपी निर्दोष सुटता कामा नये, यादृष्टीने दोष सिध्दीसाठी यंत्रणा कार्यरत झाली आहे. न्यायव्यवस्था तसेच पोलिसांबद्दल आरोपींमध्ये धाक बसण्यासाठी हे प्रमाण वाढणे आवश्यक असून पोलिस विभागाबद्दल सज्जनांना मैत्री व दुर्जनांना भीती वाटेल, असे काम पोलिस विभागाचे असावे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
बल्लारपूर येथे १० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या पोलीस ठाणे व २४ निवासस्थानाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल होते. प्रमुख पाहुणे म्हणून आ. संजय धोटे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीष शर्मा, नगराध्यक्ष छाया मडावी, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, पोलीस उपअधीक्षक जयचंद काठे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हाद गिरी, राजेंद्र मालपाणी आदी उपस्थित होते.
बल्लापूर येथे नव्याने होत असलेली इमारत केवळ विटा, सिमेंट, मातीची असू नये तर सामान्यांना चांगली सेवा देणारी तसेच वाईट प्रवृत्तींना आळा घालणारी असावी, पोलीस विभागास अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे. कर्मचारी, अधिकाऱ्यांना चांगली निवासस्थाने देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. चंद्रपूर येथे १०२ कोटी रुपये खर्च करून पोलिसांची चांगली वसाहत निर्माण होत आहे. जिल्ह्यात दोन नवीन पोलिस ठाणे मंजूर झाली असून दुगार्पुर पोलीस स्टेशनच्या इमारतीची प्रशासकीय मान्यता झाली आहे. चंद्रपूर येथे पोलिसांसाठी अत्याधुनिक व्यायामशाळा बांधली जात असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. पोलीस अधीक्षक संदीप दिवाणी यांनी प्रास्ताविक केले. संचालन पोलीस अधिकारी विकास मुंढे यांनी तर आभार बल्लारपूरचे ठाणेदार प्रदीप शिरस्कार यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)

ही कामे प्रस्तावित
बसस्थानकाचे नुतनीकरण, उपविभागीय कार्यालयाचे बांधकाम, स्टेडीयम, बॅटनिकल गार्डन ही कामे बल्लारपुरात होऊ घातली आहेत. शहरातील शाळा अत्याधुनिक होणार असून टाटा ट्रस्टच्या माध्यमातून रोजगाराचा आराखडा तयार केला जात आहे. नाट्यगृहही लवकरच होणार आहे. या शहराच्या सर्वांगिण विकासाठी आपला नेहमीच पुढाकार राहणार असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Police officers should be afraid of the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.