बाबूपेठ येथे पोलीस चौकी स्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:32 AM2021-09-06T04:32:29+5:302021-09-06T04:32:29+5:30
चंद्रपूर : बाबूपेठ, लालपेठ प्रभागातील पोलीस चौकी मागील अनेक वर्षांपासून बंद, तसेच पडक्या अवस्थेत आहेत. तेथे कचऱ्याचे साम्राज्य निर्माण ...
चंद्रपूर : बाबूपेठ, लालपेठ प्रभागातील पोलीस चौकी मागील अनेक वर्षांपासून बंद, तसेच पडक्या अवस्थेत आहेत. तेथे कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. समाजकंटकांनी दारूच्या बाटल्या टाकून घाण केली होती. त्यामुळे आम आदमी पार्टी, पोलीस मित्रांच्या साहाय्याने त्या चौकीची स्वच्छता करण्यात आली. तसेच पोलीस चौकी सुरू करण्यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात येणार आहे.
बाबूपेठ, लालपेठ येथे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बाबूपेठ, लालपेठ येथील पोलीस चौकी बंद असल्याने गुन्हेगारांवर वचक नाही, तसेच चौकी बंद असल्याने मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला असल्याची माहिती आपचे शहर सचिव राजू कुडे यांना मिळताच त्यांनी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधाकर आंभोरे यांच्याशी भेटून चर्चा केली. त्यांनी योग्य प्रतिसाद दिल्याने आम आदमी पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शहर पोलीस स्टेशनची चमू यांनी एकत्र येत पोलीस चौकी आवारात स्वच्छता अभियान राबविले. आता पोलीस अधीक्षकांची भेट घेत पोलीस चौकी सुरू करण्याकरिता प्रयत्न केले जाणार आहे. या अभियानात शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांची चमू, पोलीस मित्र, तसेच आपचे जिल्हा अध्यक्ष सुनील मुसळे, शहर सचिव राजू कुडे, जिल्हा युवा अध्यक्ष मयूर राईकवर, जिल्हा कोषाध्यक्ष भीवराज सोनी, प्रभाग संयोजक सुखदेव दारुंडे, संस्थापक सदस्य अश्रफ सय्यद, चंदू मदुरवार, प्रवीण चूनारकर, शंकर कायारकर, महेश सिंह पाजी, महेश गुप्ता, बाबाराव खडसे, सुशांत धकाते, जयदेव देवगडे, बाबूपेठ प्रभाग महिला संयोजिका सुजाता बोदेले आदी उपस्थित होते.