शहरात पोलिसांची गस्त, तरीही चंद्रपूरकर त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:26 AM2021-01-21T04:26:05+5:302021-01-21T04:26:05+5:30
चंद्रपूर : शहरातील चार पोलीस ठाण्यांच्या वाहनांद्वारे शहरात दिवसरात्र गस्त घातली जाते. पोलीस अधिकारी, कर्मचारी, अमंलदार गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ...
चंद्रपूर : शहरातील चार पोलीस ठाण्यांच्या वाहनांद्वारे शहरात दिवसरात्र गस्त घातली जाते. पोलीस अधिकारी, कर्मचारी, अमंलदार गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवून असतात. मात्र तरीसुद्धा चोरी, घरफोडी, दुचाकी चोरी थांबण्याचे नाव नाही. मागील वर्षभरात जिल्ह्यात २०२ घटना घरफोडी, ७१३ चोरी, २८ जबरी चोरी, दरोड्याच्या घटना दोन ठिकाणी घडल्या आहेत. वाढत्या चोरींच्या घटनामुळे चंद्रपूरकर त्रस्त झाले आहेत. चंद्रपूर शहरात रामनगर, शहर, पडोली, दुर्गापूर पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या वाहनाद्वारे एक दुय्यम अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गस्त घातली जाते. यासोबतच बीट मार्शल, निर्भया, दामिनी व गस्ती पथकसुद्धा शहरात गस्त घालत असते. प्रत्येक चौकात, गल्लीबोळात हे पथक गस्त घालत असल्याचे सांगितले जात असले तरीही शहरात चोरी, जबरी चोरी, दरोड्याचे प्रमाण वाढत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. पोलिसांकडून चोरी, घरफोडीचर अनेक प्रकरणक उघडकीस येत असलली तरी वाढत्या चोरीच्या घटनांमुळे चंद्रपूरकर त्रस्त झाले आहेत. त्यामुळे चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान चंद्रपूर पोलिसांपुढे ठाकले आहे.
बॉक्स
नियंत्रण कक्षाचे नियंत्रण
पोलिसांकडून आपापल्या हद्दीत गस्त घातली जाते. गस्तीवरील पोलिसांच्या हालचालींवर पोलीस स्टेशनच्या गस्त अधिकाऱ्यासह नियंत्रण कक्षाचे नियंत्रण असते. बीट मार्शलला दर तासाला नियंत्रण कक्षास माहिती द्यावी लागते. रोटेशन पद्धतीने पोलिसांची गस्तीसाठी ड्युटी लागते. निर्भया व दामिनी पथके शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे, बाजार, आझाद गार्डन, रामाळा तलाव परिसरात गस्त घालत असतात.
बॉक्स
गुन्हे उघडकीत चंद्रपूर महाराष्ट्रात पाचवा
मागील वर्षभरात चंद्रपूर दोन ठिकाणी दरोडा, २८ ठिकाणी जबरी चोरी, २०२ घरफोडी, ७१३ चोरीच्या घटना घडल्या. बहुतांश प्रकरणे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे. यामध्ये दरोडा शंभर टक्के, जबरी चोरी ७५ टक्के, घरफोडी ४३ टक्के, चोरी ४५ टक्के उघडकीस आले आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा चोरीसंदर्भातील गुन्हे उघडकीस आणण्यात पाचव्या क्रमांकावर आहे.