पोलिसांनी दारू बंद केले; उत्पादन शुल्क विभागाने उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:29 AM2021-08-15T04:29:41+5:302021-08-15T04:29:41+5:30

गोंडपिपरी : गडचिरोली जिल्ह्यात दारूपुरवठा करण्याचा आरोपाखाली आष्टी पोलिसांनी गोंडपिपरी शहरातील एका दारू दुकानाचे शटर बंद केले. मात्र अवघ्या ...

Police stopped alcohol; Opened by the Excise Department | पोलिसांनी दारू बंद केले; उत्पादन शुल्क विभागाने उघडले

पोलिसांनी दारू बंद केले; उत्पादन शुल्क विभागाने उघडले

Next

गोंडपिपरी : गडचिरोली जिल्ह्यात दारूपुरवठा करण्याचा आरोपाखाली आष्टी पोलिसांनी गोंडपिपरी शहरातील एका दारू दुकानाचे शटर बंद केले. मात्र अवघ्या तासाभरातच राज्य उत्पादन शुल्क विभागाने हे शटर उघडले. आष्टी पोलिसांच्या या उताविळपणाची चर्चा शनिवारी दिवसभर होती. राजकीय सुडबुद्धीतून हा प्रकार घडल्याचीही चर्चा तालुक्यात रंगली आहे.

गोंडपिपरी तालुक्याला गडचिरोली जिल्ह्याची सीमा लागून आहे. चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातही दारूचा पुरवठा अचानक वाढला, अशी चर्चा सुरू आहे. अशातच गुरुवारी गोंडपिपरी तालुक्यातील खरारपेठ येथील अवथरे नामक व्यक्तीकडून आष्टी पोलिसांनी अवैधरित्या दारू तस्करी करताना पाच पेट्या देशी दारू पकडली. याची चौकशी सुरू असताना शनिवारी दुपारी अचानक गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी पोलिसांचे पथक आरोपीला घेऊन गोंडपिपरी शहरात दाखल झाले. चौकशीअंति आष्टी पोलिसांनी देशी दारू दुकानाचे शेटर बंद केले. यावेळी शेकडो नागरिक उपस्थित होते. आष्टी पोलिसांनी बंद केलेले देशी दारू दुकानाचे शटर अवघ्या तासाभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी उघडले. तासाभरात घडलेल्या या नाट्यमय प्रकाराची तालुक्यात खमंग चर्चा रंगली आहे.

140821\img-20210814-wa0033.jpg

क्राईम

Web Title: Police stopped alcohol; Opened by the Excise Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.