मद्यपींवर पोलिसी वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 12:13 AM2018-03-02T00:13:00+5:302018-03-02T00:13:00+5:30

शुक्रवारी सर्वत्र उत्साहात धूळवड साजरी व्हावी, यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला असून दारू विक्रेते व मद्यपींवर पोलिसी वॉच असणार आहे.

 Policy Watch on Alcoholics | मद्यपींवर पोलिसी वॉच

मद्यपींवर पोलिसी वॉच

Next
ठळक मुद्देबेदरकार वाहनचालकांवर कारवाई : होळी साजरी करा; पण जपून

ऑनलाईन लोकमत
चंद्रपूर : शुक्रवारी सर्वत्र उत्साहात धूळवड साजरी व्हावी, यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला असून दारू विक्रेते व मद्यपींवर पोलिसी वॉच असणार आहे. मद्य पिऊन बेदरकार वाहन चालविणाºयांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस विभागाने स्पष्ट केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी लागू आहे. तरीही जिल्ह्यात अवैध मार्गाने दारू विक्री केली जाते. यावर अंकूश लावण्याचा पोलीस सातत्याने प्रयत्न करीत आहेत. मात्र दारू विक्रीवर आळा बसू शकला नाही. गुरुवारी आणि शुक्रवारी होळी व धूळवड असल्यामुळे या दिवसात दारू विक्रीलाही उधान आले असते. मात्र यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांच्या मार्गदर्शनात विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
रंगपंचमी या रंगाच्या उत्सवात अनुचित घटनेचे ग्रहण येऊ नये, यासाठी अवैध दारू विक्रेते व मद्यपींवरही विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. बेदरकारपणे अतिशय वेगात वाहन चालविणे, रॅश ड्रायव्हींग, ट्रिपल सीट, स्टंटबाजी करणे शुक्रवारी महागात पडणार आहे. कारण अशा वाहनचालकांना नियंत्रित करण्यासाठी शहरातील चौकाचौकात, रस्त्यावर पोलीस तैनात ठेवण्यात येणार आहे.
१३९२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
होळीत गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा उपद्रव होऊ नये, यासाठी पोलिसांनी जिल्ह्यातील एक हजार ३९२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. यात सीआरपीसी कलम १०७/११६ (३) अन्वये ५८४, कलम ११० अन्वये ७६, कलम ९३ दारूबंदी कायदा अन्वये १६८, सीआरपीसी कलम १४४ (३) अन्वये ४६६, कलम ९१ महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये २७, सीआरपीसी कलम १०९ अन्वये ४, कलम ५६ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये दोन, सीआरपीसी कलम १४९ अन्वये ४३ आणि सीआरपीसी कलम १५१ (३) अन्वये २२ जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
अडीच कोटींचा मुद्देमाल ताब्यात
होळीच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून जिल्हाभरातील पोलिसांचे कोम्बिंग आॅपरेशन सुरू आहे. यात अंतर्गत आतापर्यंत दोन कोटी ७६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ५२२ प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे.

Web Title:  Policy Watch on Alcoholics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.