गावातील प्रत्येक गोष्टींकडे राजकीय नेत्यांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:15 AM2020-12-28T04:15:36+5:302020-12-28T04:15:36+5:30
चंद्रपूर : ग्रामपंचायत निवडणूक राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नसली तरी पक्षाचे पुढारी आपलाच कार्यकर्ता या गावात ...
चंद्रपूर : ग्रामपंचायत निवडणूक राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नसली तरी पक्षाचे पुढारी आपलाच कार्यकर्ता या गावात निवडणून यावा यासाठी प्रयत्न करीत आहे. यासाठी त्यांच्या गावात चकरा वाढला आहे. दऱम्यान, शेतात सध्या काम असल्यामुळे दिवसभर शेतात आणि रात्री उशारीपर्यंत राजकीय गप्पा अशी काहीशी अवस्था सध्या गावात बघायला मिळत आहे.
नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतीम तारीख ३० डिसेंबर आहे. असे असताना अनेक उमेदवारांनी नामांकन अद्यापही अर्ज दाखल केलेले नाही. नामांकन अर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव त्यांच्याकडून अद्यापही केली जात आहे. काही गावात उमेदवारांचा अजूनही शोध सुरूच आहे. मोठे राजकीय पुढारी तालुक्याच्या ठिकाणी वास्तव्याला आहेत. गावातील राजकारणाची सुत्रे ते सांभाळत आहेत. काहींनी स्वतंत्र पॅनलदेखील बनविले आहे. या पॅनलचा प्रत्येक उमेदवार निवडून यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ग्राम पंचायतींची निवडणूक ही गावासाठी अतिश महत्वाची असते. गावाचा विकास एवढ्या एकाच मुद्यावर ही निवडणू लढविली जाते.
जिल्ह्यातील ६२९ ग्राम पंचायतीच्या निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाचीही तयारी सुरू आहे. गावागाड्यातील राजकारण दिवसागणीक तापत आहे.
बॉक्स
रात्री उशीरापर्यंत राजकीय गप्पा
ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनलद्वारे निवडणूक लढविली जाते. अधिकाधिक मतदान मिळावे, यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करीत आहे. दरम्यान, सध्या शेतातील कामे सुरु असल्यामुळे दिवसभर शेतात काम आणि रात्री उशिरापर्यंत राजकीय गप्पा असे काहीसे वातावरण गावात दिसत आहे.