राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 10:23 PM2019-03-12T22:23:21+5:302019-03-12T22:23:42+5:30

लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे सर्व राजकीय पक्षांनी काटेकोर पालन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी केली. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या सर्व राजकीय पक्षांची बैठकीत ते बोलत होते.

Political parties have strict adherence to the code of conduct | राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे

राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे

Next
ठळक मुद्देकुणाल खेमणार : जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे सर्व राजकीय पक्षांनी काटेकोर पालन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी केली. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या सर्व राजकीय पक्षांची बैठकीत ते बोलत होते.
जिल्हाधिकारी डॉ. खेमणार म्हणाले, ११ एप्रिल रोजीे पहिल्याच टप्प्यात चंद्रपूर लोकसभा निवडणूक होत आहे. निवडणुका काळामध्ये आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, यासाठी काटेकोर प्रयत्न करत आहे. उमेदवारांचे खर्च, जाहिराती, पेड न्यूज याकडे प्रशासनाचे लक्ष राहणार आहे. वाहन, झेंडे व फलकाचा वापर करताना राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे उल्लंघन करू नये. सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या पोस्ट केल्याचे आढल्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्देशित केलेल्या नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. खेमणार यांनी सांगितले.
अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संपत खलाटे, निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर, उपमुख्य कार्यकारी महिला व बाल कल्याण अधिकारी संजय जोल्हे, जि. प. मुख्य वित्त अधिकारी अशोक मातकर, ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता पिपरे आदींनीही महत्त्वाच्या सूचना दिल्या. यावेळी शंकांचे निरसनही करण्यात आले.
बैठकीला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, काँग्रेसचे चंद्रपूर महानगर अध्यक्ष नंदू नागरकर, भाकपचे नामदेव कन्नाके, काँग्रेसचे अनिल सुरपाम, मनसेचे दिलीप रामेडवार, वंचित बहुजन आघाडीचे धीरज बोबडे, काँग्रेसचे राजु दास, भारिप बहुजन महासंघाचे राजु किलके, साम्यवादी कम्युनिस्ट पार्टीचे विजय चौधरी, शिवसेनेचे प्रफुल्ल पुलगमकर, भाजपचे सरचिटणीस राहुल सराफ, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील काळे, हर्षवर्धन पिंपरे, राजू कक्कड, मनसेचे सत्यजित शहा, संतोष दास, अजय कोंडलेवा, प्रतिमा ठाकूर, भरत गुप्ता, माला मेश्राम, प्रदीप रत्नपारखी, विशाल दुर्योधन, बसपाचे विनित तवासे आदींची उपस्थिती होती.
चंद्रपूर जिल्ह्यात २ हजार ८७२ व्हीव्हीपॅट
लोकसभा निवडणुकीत पारदर्शी मतदान व्हावे, यासाठी प्रथमच दोन हजार ८७२ व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरीफायबल पेपर आॅडिट्रेल) यंत्रांचा वापर केला जाणार आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची कार्यवाही सुरू आहे. हे प्रशिक्षण तीन स्तरावर होईल. जिल्हाधिकारी डॉ. खेमणार व अन्य अधिकाऱ्यांनी माध्यम प्रतिनिधींच्या उपस्थितीत प्रात्यक्षिक सादर करून माहिती दिली. मतदानानंतर सात सेकंदामध्ये मतदाराला पावती मिळेल. त्यावर निवडणूक चिन्ह, नाव व उमेदवाराचा मतपत्रिकेतील अनुक्रमांक नमूद असेल. या पावतीमुळे मतदाराने दिलेल्या मताची खात्री करणे शक्य आहे.

Web Title: Political parties have strict adherence to the code of conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.