प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:24 AM2020-12-23T04:24:45+5:302020-12-23T04:24:45+5:30
फोटो - प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांना निवेदन देताना किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोशन पचारे घुग्घुस : येथील विविध कारखाने व ...
फोटो - प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांना निवेदन देताना किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोशन पचारे
घुग्घुस : येथील विविध कारखाने व रेल्वे सायडिंग, कोळसा हॅंडलिंग प्लाॅंटपासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून शेतकऱ्यांच्या पिकांचेही नुकसान होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कारखाण्यांवर कारवाई करण्याची मागणी किसान काँग्रेसने केली आहे. यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.
घुग्घुस लोकवसाहतीला लागून कच्च्या लोखंड उत्पादनाचा, सिमेंट व कोळसा खाणीच्या रेल्वे सायडिंग आणि कोल हॅण्डलिंग सयंत्रापासून मोठ्या प्रमाणावर प्रदुषण होत आहे. तिन्ही बाजूनी होत असलेल्या प्रदुषणामुळे नागरिकांना विशेषतः शाळेकरी मुलांच्या आरोग्यावर, शेतीच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. त्यामुळे प्रदूषण करणाऱ्या कारखाण्यावर कारवाई करण्याची मागणी, किसान काँग्रेस जिल्हा कांँग्रेस कमेटीचे जिल्हाअध्यक्ष रोशन पचारे यांनीकेली आहे.