तलावांचे सर्वेक्षण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:33 AM2021-01-08T05:33:07+5:302021-01-08T05:33:07+5:30

रानडुकरांचा बंदोबस्त करावा चंद्रपूर : शहरातील वृंदावननगर, तुळशीनगरामध्ये डुकरांची संख्या वाढली असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...

Ponds should be surveyed | तलावांचे सर्वेक्षण करावे

तलावांचे सर्वेक्षण करावे

Next

रानडुकरांचा बंदोबस्त करावा

चंद्रपूर : शहरातील वृंदावननगर, तुळशीनगरामध्ये डुकरांची संख्या वाढली असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. बाहेर अंगणात छोटी बालके खेळत असल्याने धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंदोबस्त करण्याची मागणी आहे.

जिवतीतील सौरदिवे नादुरुस्त

जिवती : तालुक्यातील अनेक गावात सौरदिवे लावण्यात आले. परंतु, अनेक गावात लावण्यात आलेले सौरदिवे बंद आहेत. त्यामुळे रात्री अपघाताची शक्यता आहे. सौरदिवे दुरुस्त करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

शेतकरी योजनेपासून वंचित

चंद्रपूर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र आजही काही गावातील शेतकऱ्यांना लाभ मिळत नसल्याने त्यांच्यात संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे गावागावात सर्वेक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

-----

सिमेंटीकरणाची नागरिकांची मागणी

चंद्रपूर : येथील तुळशीनगर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन येथील रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.

दुरुस्ती करावी

गोंडपिपरी : तालुक्याला जोडणाऱ्या ग्रामीण भागातील विविध रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले. त्यामुळे ये-जा करणाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय, अपघाताच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा

वरोरा : येथे मोठ्या प्रमाणात मोकाट जनावर असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर सदर जनावरे उभी राहत असल्याने मार्ग काढण्यास अडचणी येतात. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बंदोबस्त करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

----

Web Title: Ponds should be surveyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.