आदिवासी वसतिगृह इमारतीची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:19 AM2021-06-28T04:19:57+5:302021-06-28T04:19:57+5:30

कोट्यवधीचा निधी पाण्यात : इमारत ठरली प्रेमीयुगुलाचे आश्रयस्थान कोरपना: तालुक्यातील गडचांदूर या औद्योगिक नगरीत माणिकगड सिमेंट कंपनीच्या दोन किलोमीटर ...

Poor condition of tribal hostel building | आदिवासी वसतिगृह इमारतीची दुरवस्था

आदिवासी वसतिगृह इमारतीची दुरवस्था

Next

कोट्यवधीचा निधी पाण्यात : इमारत ठरली प्रेमीयुगुलाचे आश्रयस्थान

कोरपना: तालुक्यातील गडचांदूर या औद्योगिक नगरीत माणिकगड सिमेंट कंपनीच्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या हिरापूर ग्रामपंचायत हद्दीत आदिवासी मुला-मुलींचे शैक्षणिक विकास व प्रगतीसाठी गडचांदूर-पाटण या मुख्य रस्त्यालगत शासकीय जमिनीवर वसतिगृहाची निर्मिती केली. मात्र आता या इमारतीची अत्यंत दुरवस्था झाली आहे.

महाराष्ट्र शासनाने या कामासाठी सहा कोटी निधीची तरतूद करून उपरोक्त कामाचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फतीने उपरोक्त जमिनीवर आदिवासी मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहासाठी अद्ययावत सर्व सोयी सुविधायुक्त देखणी इमारती तयार करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाने उपरोक्त इमारतीचे बांधकाम सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून ७ एप्रिल २०१७ रोजी कायदेशीर ताबा इमारतीचा प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग यांना दिला. तसेच या इमारतींना पिण्याच्या पाण्याच्या सुविधाकरिता बोकुळडोह येथून नळ योजनेतून पाईनलाईन टाकली. ते काम अर्धवट अवस्थेत पडले आहे. शासनाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या दोन्ही इमारती २०१९ पर्यंत सुस्थितीत होत्या. मात्र सन २०२०-२१ वित्तीय वर्षात आदिवासी विकास विभागाच्या दिरंगाई व दुर्लक्षपणामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याचे विदारक चित्र या ठिकाणी दिसून येते. या इमारती अद्यावत असताना इमारतीमधील फॅन, इलेक्ट्रिक साहित्य, दरवाजे, खिडक्याच्या काचा, स्टील राॅड, मार्बल टाईल्स सर्व चोरीला गेले आहे. याठिकाणी जुगाराचा अड्डा, दारूच्या खाली बाटल्या पडलेल्या असतात. प्रेमीयुगुलांचे तर हे आश्रयस्थान झाल्याचे चित्र पाहायला मिळते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आबीद अली, विकास टेकाम, माणिकराव आडे, विनोद जुमडे, प्रवीण जाधव, रोशन बुरेवार जिवतीवरून येताना शासनाची इमारत दुर्लक्षित का म्हणून पाहणी करायला गेले असताना हा प्रकार उघडकीस आला. शासकीय मालमत्तेच्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करून वसुली करण्यात यावी व तातडीने त्याठिकाणी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून आदिवासी विद्यार्थ्यांकरिता इमारती उपलब्ध करून द्यावे व या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे,आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर आमदार सुभाष धोटे यांना दिले आहे.

Web Title: Poor condition of tribal hostel building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.