वनसडी ते भोयगाव रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:29 AM2021-09-27T04:29:39+5:302021-09-27T04:29:39+5:30
हा मार्ग जिल्हा मुख्यालय चंद्रपूर शहराला जोडणारा, सर्वांत कमी अंतराचा मार्ग आहे. त्यामुळे यामार्गे प्रचंड रेलचेल असते. अलीकडेच या ...
हा मार्ग जिल्हा मुख्यालय चंद्रपूर शहराला जोडणारा, सर्वांत कमी अंतराचा मार्ग आहे. त्यामुळे यामार्गे प्रचंड रेलचेल असते. अलीकडेच या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र, अल्पावधीतच हा रस्ता उखडला जातो आहे. या मार्गादरम्यान अनेक पुलांची कामे अर्धवट अवस्थेत पडली आहे. त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना अनेक अडचणींना वाहतूकदारांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मागील एक वर्षापासून कोरपना- भोयगव- चंद्रपूर ही बस बंद आहे. याचाही फटका सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागतो आहे. यात भारोसा, भोयेगाव, एकोडी, इरई, गाडेगाव, खैरगाव, सोनुरली, सांगोडा, अंतरगाव, वणोजा, नारंडा येथील ग्रामस्थांना तालुका मुख्यालय कोरपना येथे जाणे- येणे अडचणीचे झाले आहे.
त्यामुळे या मार्गाची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.