व्याहाड- ब्रम्हपुरी जिल्हा मार्गाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:22 AM2021-06-04T04:22:20+5:302021-06-04T04:22:20+5:30
या प्रमुख मार्गाचे अनेक टप्पे पाडून वेगवेगळ्या कंत्राटदारांना दुरुस्तीची कामे दिल्या गेली. या रस्त्याने क्षमतेपेक्षा जास्त जड वाहतूक ...
या प्रमुख मार्गाचे अनेक टप्पे पाडून वेगवेगळ्या कंत्राटदारांना दुरुस्तीची कामे दिल्या गेली. या रस्त्याने क्षमतेपेक्षा जास्त जड वाहतूक व इतर वाहनांची वर्दळ असते. या भागात गोसेखुर्द उजवा कालवा अंतर्गत अनेक ठिकाणी बांधकामे सुरु आहेत. त्याचबरोबर रेतीची जड वाहतूक व इतर साहित्यांच्या वाहतुकीमुळे अक्षरशः चक विरखल ते निमगाव दरम्यानचा तीन किलोमीटरमधील रस्ता जमिनीत समाविष्ट झाला आहे. कंत्राटदार कंपनीकडून अजूनही काम करण्यात आले नाही. त्यामुळे बांधकाम विभागही हतबल असल्याचे दिसून येत आहे. या रस्त्याचे करोली नाला ते आकापूर बसस्टॉपपर्यंत डागडुजीची कामे करण्यात आली. मात्र एका वर्षातच रस्त्यावरील जड वाहतुकीमुळे रस्ता जैसे थे झाला आहे. या भागातील नागरिकांना तालुका, जिल्हा व इतर बाजारपेठेकरिता याच रस्त्याचा वापर करावा लागत असल्याने या रस्त्याची दुरुस्तीची मागणी नागरिक करीत आहे.