कुख्यात हाजी गॅग पोलिसांच्या ताब्यात

By admin | Published: April 20, 2017 01:27 AM2017-04-20T01:27:47+5:302017-04-20T01:27:47+5:30

एकीकडे चंद्रपुरात महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना जिल्ह्यातील कुख्यात हाजी गॅग

In the possession of the infamous Haji Gag police | कुख्यात हाजी गॅग पोलिसांच्या ताब्यात

कुख्यात हाजी गॅग पोलिसांच्या ताब्यात

Next

आॅपरेशन आॅल आऊटदरम्यान कारवाई
चंद्रपूर : एकीकडे चंद्रपुरात महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना जिल्ह्यातील कुख्यात हाजी गॅग मंगळवारी रात्री मोठा गुन्हा करण्याची तयारी करण्यात व्यस्त होती. याबाबतची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी हॉटेलला घेराव घालून नऊ आरोपींना अटक केली.
अटक केलेल्या आरोपीमध्ये हाजी शेख सरवर (३६) घुग्घुस, संतोष उर्फ विक्की दुसाने (२४) गडचांदूर, जयवंत पाईकराव (२८) घुग्घुस, आनंद कांबले (२४) दुर्गापुर, अक्षय कुंटलवार (२२) घुग्घुस, शेख गौस बाबा (१८) घुग्घुस, मोहम्मद शादाब (२६) बल्लारपूर, सलमान उर्फ राज सलीम खान (२३) बल्लारपूर व मोहम्मद वखार हबीब शेख (२३) चंद्रपूर यांचा समावेश आहे.
चंद्रपुरात मनपा निवडणूक असल्यामुळे मंगळवारला रात्री आॅपरेशन आॅलआऊट मोहिम राबविण्यात येत होती. रात्री एक वाजताच्या दरम्यान शहर पोलिसांना एका हॉटेलमध्ये गुंड प्रवृत्तीचे ८ ते ९ जण असल्याची माहिती मिळाली. यांची तपासनी करण्यासाठी शहर पोलिसांची एक तुकडी हॉटेलमध्ये गेली. कोणाला काही कडण्याच्या आत पोलिसांनी बालाजी वॉर्डातील रिशा हॉटेलला घेराव घातला. आणि हॉटेलच्या रुम नंबर ३०६ चा दरवाजा ठोठावण्यात आला. दरवाजा उघडल्याबरोबर पोलिसांनी सर्च मोहीम सुरु केली. त्यावेळी आतील सर्वजण पळ काढण्याचा प्रयत्न करु लागले. मात्र पोलिसांनी संपूर्ण हॉटेलला घेराव घातला असल्यामुळे ते अपयशी ठरले. यावेळी पोलिसांसोबत हॉटेलमधील युवकांशी झटापट झाली. त्यामध्ये तीन पोलीस जखमी झाले.त्यावेळी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी एक धारधार खंजर, चाकू, एक दोर, मिरची पावडर, बिअरच्या दोन बाटला आदी सामान जप्त केले. (नगर प्रतिनिधी)

ंं अटक केलेल्या आरोपींवर असलेले गुन्हे
शेख हाजीवर यापूर्वी शहर पोलीस स्टेशनमध्ये तीन, घुग्घुस पोलीस स्टेशनमध्ये दहा, भद्रावतीमध्ये एक, गडचांदूरमध्ये एक, आरोपी संतोष दुसाने वर गडचांदुरमध्ये तीन व टेकामांडवामध्ये एक, जयवंत पाईकवारवर चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात एक, आनंद कांबळेवर दुर्गापुरमध्ये एक, मोहम्मद शादाबवर बल्लारपुरमध्ये एक, भद्रावतीमध्ये एक, सलमान खानवर बल्लारपुरमध्ये एक, रामनगर पोलीस ठाण्यात एक तर मोहम्मद वखारवर रामगनर पोलीस ठाण्यात एक गुन्ह्याची नोंद आहे.

 

Web Title: In the possession of the infamous Haji Gag police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.