उघड्या चेंबरमुळे अपघाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:23 AM2021-05-03T04:23:14+5:302021-05-03T04:23:14+5:30

रस्त्यावर आढळतात प्लास्टीक चंद्रपूर : शहरात दिवसेंदिवस प्लास्टीक पिशव्यांचा वापर वाढत आहे. शहरातील गंजवॉर्ड, गोलबाजार, भिवापूर सुपर मार्केट व ...

Possibility of accident due to open chamber | उघड्या चेंबरमुळे अपघाताची शक्यता

उघड्या चेंबरमुळे अपघाताची शक्यता

Next

रस्त्यावर आढळतात प्लास्टीक

चंद्रपूर : शहरात दिवसेंदिवस प्लास्टीक पिशव्यांचा वापर वाढत आहे. शहरातील गंजवॉर्ड, गोलबाजार, भिवापूर सुपर मार्केट व अन्य बाजाराच्या प्लास्टीक पिशव्या ग्राहकांना दिल्या जात आहे.

बाजारातील वजकाटे तपासणी करावी

चंद्रपूर : भाजीविक्रेते वजनाऐवजी गोट्याचा वापर करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे ग्राहकांची मोठी लूट होत आहे. त्यामुळे गोट्याचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

बेरोजगारांमध्ये पुन्हा नैराश्य

चंद्रपूर : सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम नसल्यामुळे ते नैराश्यात सापडले आहे. लॉकडाऊनने आता पुन्हा नोकरभरतीवर निर्बंध आले असल्याने तरुणात नैराश्य निर्माण झाले आहे. त्यामुळे तरुणांच्या हाताला काम देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी बेरोजगारांकडून केली जात आहे.

जनावरांमुळे नागरिकांना त्रास

चंद्रपूर : येथील तुकूम, पठाणपुरा परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे असतात. अनेक वेळा रात्रीच्या वेळी रस्त्याच्या मधोमध बसातात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.

लाभार्थ्यांना योजनेचा लाभ द्या

चंद्रपूर : श्रावणबाळ योजना, राजीव गांधी निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना अशा योजनेंतर्गत वृद्धांना मानधन देण्यात येते. मात्र, या योजनेचा लाभ घेताना वृद्धांना खूप अडचणी जाणवतात. पैसे जमा होण्याची निश्चित तारीख माहीत नसल्यामुळे बँकेभोवती चकरा माराव्या लागतात. तासन्‌तास रांगेत उभे रहावे लागते. यामुळे शासनाने यात नियमितता ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे.

धोकादायक पुलाला कठडे लावा

चंद्रपूर : जिल्ह्यात अनेक नाल्यांवर पुलांचे बांधकाम झाले आहे. मात्र, पुलाला संरक्षण कठडे नसल्याने अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे या पुलांवर कठडे लावण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील नाल्यांवर संरक्षण कठडे तुटले असून, काही चोरीलाही गेले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन नव्याने कठडे बांधावे, अशी मागणी होत आहे.

जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला

चंद्रपूर : सध्या जीवनावश्यक वस्तूसह इतर सर्वच वस्तूंचे दर गगणाला भिडले आहे. तेलाचे भाव तर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ८० ते ९० रुपयांना मिळणारे तेल पॉकेट आता १४५ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट बिघडत आहे. अन्नदाता बळीराजाच्या शेतमालाला मात्र आजही भाव जैसे थे असल्याची स्थिती दिसून येत आहे. बळीराजा पुरता हतबल झालेला दिसत आहे. आता तर आणखी पेट्रोलच्या दरातही वाढ केली आहे.

शासकीय कार्यालयांची स्वच्छता करावी

चंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश शासकीय कार्यालयात अस्वच्छता आहे. विशेषत: प्रशासकीय भवन परिसर सोडला तर इतर कार्यालयामध्ये अस्वच्छता बघायला मिळते. भिंतीवर व पायऱ्यावर तंबाखू व गुटखा खाऊन थुंकल्याचे दिसून येते. या प्रक्रियेत जनतेसोबतच कार्यालयीन कर्मचाऱ्यांचाही सहभाग असतो. त्यामुळे दंडात्मक कारवाई करण्याची मागणी आहे.

स्वच्छता अभियानाचा फज्जा

चंद्रपूर : परिसरातील अनेक गावांमध्ये स्वच्छता अभियानाचा फज्जा उडत आहे. गावांमध्ये नाल्या, रस्ते, शौचालय आदी सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे नागरिकांना उघड्यावर शौचालयाला जावे लागत असल्याचे चित्र आहे.

वार्डनिहाय लसीकरण केंद्र द्यावे

चंद्रपूर : कोरोना संकट वाढत आहे. त्यावर प्रभावी उपाय म्हणून लस घेणे होय, परंतु लसीकणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी राहते. त्यामुळे नागरिकांना लसीकरणासाठी रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे प्रत्येक वॉर्डात लसीकरण केंद्र निर्माण करावे, अशी मागणी होत आहे.

नेटवर्कअभावी मोबाइल ग्राहक त्रस्त

चंद्रपूर : शहरातील काही वार्डामध्ये विविध कंपन्यांसह बीएसएनएलचेही नेटवर्क नाही. त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहे. त्यातच ऑनलाइन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नेटवर्क समस्या सोडविण्याची मागणी केली जात आहे.

क्रीडा संकुलाचे बांधकाम त्वरित करा

चंद्रपूर : येथील क्रीडा संकुलाची दुरुस्ती केली जात आहे. मात्र, मागील अनेक दिवसांपासून काम संथगतीने सुरू असल्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे क्रीडा संकुलाचे काम त्वरित करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

शहरातील सिग्नल सुरू करा

चंद्रपूर : शहरातील पडोली चौक, मिलन चौक, तसेच बाबूपेठ परिसरातील रस्त्यावरील सिग्नल बंद असल्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

अपघात होण्यापूर्वी वीज खांब हटवा

चंद्रपूर : शहरातील काही चौकामध्ये रस्त्याच्या मधोमध वीज खांब आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. वीज खांब काढून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. संचारबंदी असल्याने रस्त्यावरील रहदारी कमी झाली आहे.

कर्मचारी थकबाकी मिळण्याच्या प्रतीक्षेत

चंद्रपूर : मलेरिया प्रतिबंधक फवारणी कामगारांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याची मागणी केली आहे. मलेरिया प्रतिबंधक फवारणी कामगारांना सहावा वेतन आयोग पाच वर्षे उशिराने लागू करण्यात आला. दरम्यान, या कालखंडातील थकबाकी कामगारांना अद्याप देण्यात आली नाही.

Web Title: Possibility of accident due to open chamber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.