रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 11:00 PM2018-07-28T23:00:56+5:302018-07-28T23:01:12+5:30
शहरातील अनेक रस्त्यांचे डांबर व सिमेंट उखडून जागोजागी खड्डे पडले आहेत. रत्नमाला चौक ते उड्डान पुलाजवळ मोठा खड्डा पडल्याने एमएच ३४ बीके १८१७ क्रमांकाच्या दुचाकीचा अपघात होवून एक युवक गंभीर जखमी झाला़ वणी मार्गावरील टोल टॅक्ससमोरी १०० फुटाच्या अंतरावरही तीन फुटांचा खड्डा असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे़
Next
ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : दुरुस्ती करण्याची मागणी
<p>लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : शहरातील अनेक रस्त्यांचे डांबर व सिमेंट उखडून जागोजागी खड्डे पडले आहेत. रत्नमाला चौक ते उड्डान पुलाजवळ मोठा खड्डा पडल्याने एमएच ३४ बीके १८१७ क्रमांकाच्या दुचाकीचा अपघात होवून एक युवक गंभीर जखमी झाला़ वणी मार्गावरील टोल टॅक्ससमोरी १०० फुटाच्या अंतरावरही तीन फुटांचा खड्डा असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे़
वरोरा शहरातील वर्दळीने गजबजलेल्या आझाद वॉर्डातील नालीवरसिमेंट रपटा तयार करण्यात आला़ यावरील उघड्या पडून दोन फुटांचा खड्डा तिथे तयार झाल्याचे दिसून येत आहे. या मार्गावरून ये-जा करणारे नागरिक जीव धोक्यात ठेवून पुढे जात आहेत़ शहरातील प्रमुख रस्त्यांची अशी गंभीर अवस्था असूनही प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही़ झोपडपट्टी वसाहतीतील रस्त्यांच्या बाबतीत बोलायलाच नको, अशी स्थिती निर्माण झाली आहे़ अतिवृष्टीमुळे वरोरा शहरातील अनेक रस्त्यांची अशी दैना झाली़ बांधकामासाठी लाखो रूपये खर्च करण्यात आले़ हा सर्व खर्च पहिल्या पाण्यातच वाया गेल्याची टीका नागरिक करीत आहेत़ प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष दिले नाही तर मोठा अपघात होण्याचा धोका वर्तविला जात आहे़