‘बेटी बचाव’ योजनेसाठी पोस्ट कार्यालयात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 11:49 PM2018-01-14T23:49:04+5:302018-01-14T23:49:50+5:30
मुलगा आणि मुलगी असा अनेकजण भेदभाव करतात. हा भेदभाव संपुष्टात आणण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना आखल्या जात आहे.
आॅनलाईन लोकमत
कोरपना : मुलगा आणि मुलगी असा अनेकजण भेदभाव करतात. हा भेदभाव संपुष्टात आणण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना आखल्या जात आहे. अशीच ‘बेटी बचाव’ योजना शासनाने सुरू केली असून या योजनेच्या लाभासाठी अनेकांची येथील पोस्ट कार्यालयात गर्दी दिसून येत आहे.
वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा असा अनेकांचा हट्टहास असतो. यातूनच मुलीचा गर्भपात केला जातो. यामुळे देशभरात मुलीचा जन्मदर कमालीचा घटला. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी विविध उपाय योजना आखून जन्मदराबाबत प्रशासनाला वेळोवेळी केंद्र आणि राज्य सरकारकडून सूचना दिल्या जात आहेत. शाळा, महाविद्यालय आणि विविध कार्यक्रमातून ‘बेटी बचाव’चा नारा दिला जात आहे. मुलगी असणाºयास आर्थिक सहाय केले जात असून यासाठी ‘बेटी बचाव’ योजना शासनाने सुरू केली आहे. या योजनेसाठी अनेक जण पोस्ट कार्यालयात अर्ज सादर करीत असल्याने मोठी गर्दी पहायला मिळत आहे.
वाहनाला स्टिकर लावून बेटी बचावचा संदेश
अपवाद सोडले तर अनेक जण मुलींवर प्रेम करणारे आहेत. त्यांच्या जन्माचे स्वागत करतात. अनेकजण मुलगी जन्माला आली की पेढे, मिठाई वाटून आनंद साजरा करतात. असेच काही नागरिक आपल्या वाहनावर स्टिकरद्वारे ‘बेटी बचाव’चा संदेश देत आहेत. त्यामुळे मुलगा-मुलगी भेदभाव दूर होण्यास मदत मिळत आहे.