शासकीय जमिनींच्या धारणाधिकार बदलाला स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:27 AM2020-12-22T04:27:22+5:302020-12-22T04:27:22+5:30
राज्य शासनाकडून भाडेपट्टी तसेच कब्जेहक्कानुसार हजारो एकर शासकीय जमिनी वाटण्यात आल्या आहेत. या जमिनी आजच्या त्यांच्याकडेच ताब्यात आहेत. ...
राज्य शासनाकडून भाडेपट्टी तसेच कब्जेहक्कानुसार हजारो एकर शासकीय जमिनी वाटण्यात आल्या आहेत. या जमिनी आजच्या त्यांच्याकडेच ताब्यात आहेत. जमिनीचे धारणाधिकार बदलविण्यासाठी महसूल कायदा तयार करण्यात आला आहे. परंतु, या कायद्यातील काही तरतुदी अडचणीच्या ठरत आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल भोगवटादार वर्ग दोन व भाडेपट्टीने प्रदान केलेल्या जमिनी वर्ग एकमध्ये रूपांतरीत करण्याचा २०१९ असे या कायद्याचे नाव आहे. कृषक, निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक प्रयोजनासाठी दिलेल्या तसेच भाडेपट्टीने प्रस्थापित केलेल्या जमिनींवर संबंधित व्यक्तींचे मालकीहक्क प्रस्थापित होते. मात्र, यासाठी नियमांची मोडतोड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जमिनींचे मालकीहक्क रूपांतरणाची आधी मान्य केलेली प्रक्रिया तातडीने स्थगिती करण्याची घाई सुरू झाल्याची माहिती महसूल विभागातील सूत्राने दिली.
वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये करण्यास प्रतिबंध
राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना मंत्रालयातून एक आदेश जारी करण्यात आला. या आदेशानुसार शासनाकडून नवीन आदेश येईपर्यंत भाेगवटादार वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. या आदेशानुसार जिल्हास्तरावर माहिती मागण्याची कार्यवाही सुरू झाली. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सरकारी जमीन कब्जेधारकांमध्ये चलबिचल दिसून येत आहे.