उपविभागीय अभियंता,ठाणेदाराच्या मध्यस्तीने रास्ता रोको आंदोलनाला स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:29 AM2021-03-27T04:29:14+5:302021-03-27T04:29:14+5:30
मार्गाच्या कामाला मंजूरी मिळून अनेक वर्षाचा कालावधी लोटला.पण धाबा-गोंडपिपरी मार्गावरील कामास अध्यापपर्यंत सुरवात करण्यात आली नाही. यामुळे नागरिकांना मोठा ...
मार्गाच्या कामाला मंजूरी मिळून अनेक वर्षाचा कालावधी लोटला.पण धाबा-गोंडपिपरी मार्गावरील कामास अध्यापपर्यंत सुरवात करण्यात आली नाही. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान या मार्गाचे काम तातडीन सुरू न केल्यास शुक्रवारी शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेेने रास्ता रोको आंदोलनाचा पावित्रा घेतला. दरम्यान, धाब्याचे ठाणेदार सुशील धोपटे,उपविभागीय अभियंता रमेश शंभरकर यांनी आंदोलनकर्त्यांसोबत समन्वय साधला. यानंतर तातडीन या मार्गाचे काम सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले. यामुळे संघटनेन आंदोलनाला स्थगिती दिली.
गोंडपिपरी-धाबा हा मार्ग अतिशय वर्दळीचा आहे. हा मार्ग तेलंणाशी जोडल्या जातो. पण गेल्या अनेक वर्षापासून या मार्गाशी अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. मार्गावर मोठेमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथे अनेक अपघात देखील झाले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून विविध राजकीय पक्षानी या मार्गाचे काम तातडीन सुरू करण्याची मागणी केली. या मार्गाच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. निधी देखील वळता करण्यात आला आहे. पण सारे सोपस्कार पार पडले असताना देखील मार्गाचे कामाला सुरवात करण्यात आली नाही. धाबा व परिसरातील शेकडो नागरिकांची मागणी लक्षात घेता शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेच्या वतीने शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष गणपती चैधरी, निळकंठ पुलगमकरी, यादव झाडे व कार्यकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन दिले. दरम्यान संघटनेची मागणी लक्षात घेता गोंडपिपरीचे उपविभागीय अभियंता रमेश शंभरकर,धाब्याचे ठाणेदार सुशील धोपटे, ठाणेदार संदीप धोबे यांनी आंदोलनकर्त्यासोबत संवाद साधला. त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. यावेळी प्रशासनाच्या वतीने लवकरच मार्गाचे काम सुरू करण्यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन देण्ध्यात आले. अखेर संघटेनेनी आपल्या आंदोलनाला स्थगिती दिली.