अपघात टाळण्यासाठी ठाणेदारांनीच बुजविले रस्त्यावरील खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 05:00 AM2021-10-09T05:00:00+5:302021-10-09T05:00:52+5:30

गडचांदूर-कोरपना रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे.  पूर्वी हा मार्ग राज्य बांधकाम विभागाकडे होता. आता हा मार्ग राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित झाल्यामुळे दोन्ही विभाग एकमेकांकडे बोटे दाखवताना दिसतात. त्यामुळे नागरिकांच्या जिवासोबत खेळ सुरू आहे.  नुकताच २९ सप्टेंबरला वडगावजवळ खड्ड्यांमुळे दोन दुचाकी आपसात भिडून एकाचा जागीच मृत्यू झाला.

The potholes were filled by the police to prevent accidents | अपघात टाळण्यासाठी ठाणेदारांनीच बुजविले रस्त्यावरील खड्डे

अपघात टाळण्यासाठी ठाणेदारांनीच बुजविले रस्त्यावरील खड्डे

Next

आशिष देरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : पोलीस म्हटले की केवळ कायदा व सुव्यवस्था आपल्या डोळ्यासमोर येते. मात्र, असे एकही क्षेत्र नाही, ज्या क्षेत्राशी पोलिसांचा संबंध येत नाही. छोटासा अपघात झाला तरी पोलिसांना तत्काळ घटनास्थळी पोहोचावे लागते. गडचांदूर परिसरात सध्या रोज छोट्या-मोठ्या अपघातामुळे काहींना जीव गमवावा लागला तर अनेक जण जखमी झाले.
रोज होणाऱ्या अपघातांची मालिका पाहून ठाणेदार सत्यजित आमले यांनी स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे बुजवून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. ट्रॅक्टर, मुरूम व मजुरांसह ठाणेदारांनी स्वतः उपस्थित राहून रस्त्यांवरील खड्डे बुजवून घेतले. 
गडचांदूर-कोरपना रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे.  पूर्वी हा मार्ग राज्य बांधकाम विभागाकडे होता. आता हा मार्ग राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित झाल्यामुळे दोन्ही विभाग एकमेकांकडे बोटे दाखवताना दिसतात. त्यामुळे नागरिकांच्या जिवासोबत खेळ सुरू आहे.  नुकताच २९ सप्टेंबरला वडगावजवळ खड्ड्यांमुळे दोन दुचाकी आपसात भिडून एकाचा जागीच मृत्यू झाला. १ ऑक्टोबरला हरदोना गावाजवळ अपघात होऊन तीन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. नव्याने गडचांदूर येथे रुजू झालेले ठाणेदार सत्यजित आमले यांनी गांधी जयंतीनिमित्त स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे बुजवून माणुसकीचा परिचय दिला. ठाणेदाराच्या या कृतीचा लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाने बोध घेणे आवश्यक आहे.

 

Web Title: The potholes were filled by the police to prevent accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस