आगीत पोल्ट्री फार्म जळून खाक

By Admin | Published: April 13, 2017 12:42 AM2017-04-13T00:42:11+5:302017-04-13T00:42:11+5:30

तळोधी (बा.) येथून जवळच असलेल्या चारगाव माना या गावात दुपारी १ ते २ वाजताच्या सुमारास मनोहर विष्णुजी बोरकर यांच्या पोल्ट्री फार्मला....

Poultry form burnt in the fire | आगीत पोल्ट्री फार्म जळून खाक

आगीत पोल्ट्री फार्म जळून खाक

googlenewsNext

३ लाखांचे नुकसान : चारगाव माना येथील घटना
तळोधी (बा) : तळोधी (बा.) येथून जवळच असलेल्या चारगाव माना या गावात दुपारी १ ते २ वाजताच्या सुमारास मनोहर विष्णुजी बोरकर यांच्या पोल्ट्री फार्मला नैसर्गिक आग लागल्याने पोल्ट्री फार्म जळून खाक झाला. या आगीत पोल्ट्री फार्ममध्ये असलेल्या बॉयलर प्रजातीच्या २ हजार कोंबड्यांच्या जळुन मृत्यू झाला व कोंबड्यांसाठी ठेवलेले खाद्यही जळाले. त्यामुळे ३ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
पोल्ट्री फार्म मोकळ्या परिसरात असून परिसरात नैसर्गिक आग लागली होती. ही आग पसरत जाऊन पोल्ट्री फार्मला लागली. या आगीत कोंबड्यांसह १० ते १५ क्विंटल खाद्य जळुन खाक झाले. सोबत दुचाकीही जळाली. आगीने भयानक रूप धारण केल्याने ब्रह्मपुरी व बल्लारशा येथून अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्नीशमन दल घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण आणले. (वार्ताहर)

चिखलपरसोडी शेतशिवारात तणाचे ढिगारे जळाले
चिखलपरसोडी : चिखलपरसोडी ते चिकमारा रस्त्यालगतच्या शेतशिवारात ११ एप्रिलला दुपारी १ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत शेतातील तणसाचे ढिग, सरपनाची लाकडं, पी.व्ही.सी. पाईप जळल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.कोर्धा साझा मध्ये येत असलेल्या अनंत संदोकर, वर्षा संदोकर चिखलपरसोडी, गेरीपुंजे नागभीड, देवनाथ चनेकर चिकमारा, जोंगल, आशिष वंजारी तर किशन बागडे कृषीनगर यांच्या शेतातील तणसाचे ढिगारे जळाली. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

आगीत गाय भाजली
गेवरा : येथून जवळच असलेल्या कसरगाव येथे गावाशेजारी असलेल्या तणसाच्या ढिगाला आग लागली. या आगीत जवळ बांधून असलेली गाज भाजल्याने ती गंभीर जखमी झाली. ही घटना दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. उन्हाची तिव्रता वाढली आहे. त्यामुळे दुपारच्या सुमारास गावात स्मशान शांतता होती. दुपारच्या सुमारास अचानक सुभाष तिवाडे यांच्या घराशेजीच असलेल्या तणसाच्या ढिगाला आग लागली. त्यालगतच गायी, बैल बांधलेले होते. आगीमुळे गुरे दावे तोडून पळून गेले. मात्र एक गाय या आगीत सापडल्याने ती जखमी झाली. ग्रामस्थांनी धाव घेत आग आटोक्यात आणली. गोसेखुर्द कालव्याचे काम करणाऱ्या मुसळे कंपनीचा पाण्याचा टँकर तातडीने उपलब्ध झाल्याने फार मोठी मदत झाली. जनावरांचा संपुर्ण चारा जळाल्याने तिवाडे यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. (वार्ताहर)

Web Title: Poultry form burnt in the fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.