पोवनी ०२ कोळसा खाणीसमोर युवकांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:23 AM2020-12-25T04:23:17+5:302020-12-25T04:23:17+5:30
फोटो गोवरी : वेकोलिच्या पोवनी ०२ कोळसा खाणीत माती काढण्याचे काम करणाºया चड्डा कंपनीत परप्रांतीय कामगारांचा भरणा केल्यामुळे छावा ...
फोटो
गोवरी : वेकोलिच्या पोवनी ०२ कोळसा खाणीत माती काढण्याचे काम करणाºया चड्डा कंपनीत परप्रांतीय कामगारांचा भरणा केल्यामुळे छावा छात्रवीर सेनेच्या वतीने बेरोजगार युवकांनी चड्डा माती कंपनीसमोर गुरुवारी धरणे आंदोलन केले.
राजुरा तालुक्यातील पोवनी ०२ कोळसा खाणीत चड्डा कंपनीला कोळसा खाणीतून माती काढण्याचे कंत्राट देण्यात आले आहे.परंतु या कंपन्यांनी स्थानिक बेरोजगार युवकांना कंपनीत काम देण्याऐवजी परप्रांतीय कामगारांचा मोठया प्रमाणात भरणा केला आहे. त्यामुळे नियमांना डावलून माती कंपन्या स्थानिक बेरोजगार युवकांवर अन्याय करीत आहे. त्यामुळे छावा छात्रवीर कामगार सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष सचिन बोबडे यांच्या नेतृत्वात छावा क्षात्रवीर कामगार सेनेचे राजुरा तालुकाध्यक्ष सचिन ज्ञानेश्वर बोबडे, निखिल हिंगाणे, अमोल गारघाटे, विकास हिंगाणे, समाधान ढुमने, सुदर्शन देवाळकर, शरद टोंगे, रोशन बोढे, गोपाल आकनुवार, प्रविण लोणगाडगे, मोहन बोढेकर व इतर प्रकल्पग्रस्त गावातील बेरोजगार युवकांच्या उपस्थितीत पोवनी ०२ कोळसा खाणीत माती काढण्याचे काम करणाºया चड्डा कंपनीसमोर धरणे आंदोलन करून चिंचोली, गोवरी पोवनी, साखरी, हिरपूर, निंबाळा, वरोडा, चार्ली, निर्ली परिसरातील बेरोजगार युवकांना माती कंपनीत रोजगार मिळवून देण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी या आंदोलनात परिसरात बेरोजगार युवक मोठया प्रमाणात सहभागी झाले होते. स्थानिक बेरोजगार युवकांना योग्य न्याय न मिळाल्यास आंदोलन पुन्हा तीव्र करण्यात येईल, जिल्हाध्यक्ष सचिन बोबडे यांनी सांगितले. वृत्त लिहिपर्यंत आंदोलनकर्त्यांना चड्डा माती कंपनीकडून कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आले नव्हते.