पोवनी प्रकल्पग्रस्तांना अखेर न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 10:58 PM2018-02-16T22:58:18+5:302018-02-16T22:58:37+5:30

POWANI PROJECT PROJECTS | पोवनी प्रकल्पग्रस्तांना अखेर न्याय

पोवनी प्रकल्पग्रस्तांना अखेर न्याय

Next
ठळक मुद्देचार महिन्यांनी उपोषण सुटले : वेकोलिकडून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य

आॅनलाईन लोकमत
राजुरा : वेकोलि पोवनी २ व ३ या कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या अखेर वेकोलि व्यवस्थापनाने मान्य केल्या आहे. परिणामी, चार महिन्यांपासून सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाची गुरुवारी सांगता करण्यात आली.
यावेळी शेतकरी संघटनेचे माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख, तहसीलदार डॉ. रवींद्र होळी, वेकोलिचे कार्यकारी महाव्यवस्थापक बी. सी. सिंग, पोवनी कोळसा खाणीचे व्यवस्थापक जी. पुलय्या, वेकोलिचे अधिकारी सी. पी. सिंह, एकम्बरम, रमेश सिह, शेतकरी नेते शेषराव बोंडे, पं.स. सदस्य संजय करमनकर, उत्तम बोबडे, उपसरपंच अमोल घटे आदी उपस्थित होते. प्रकल्पग्रस्तांनी प्रलंबित मागण्या व समस्या मांडल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यावर सविस्तर चर्चा केली. आंदोलनामुळे पोवनी कोळसा खाण मागील चार महिन्यांपासून बंद होती. परिणामी, राष्ट्रीय हानी होत असल्याची माहिती वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली. शिवाय शेतकऱ्यांची बाजू ऐकून वेकोलि अधिकाºयांनी प्रकल्पग्रस्तांच्या सर्व मागण्या लगेच मान्य केल्या. प्रकल्पग्रस्तांनी १० आॅक्टोबर २०१७ पासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरु केले होते. चार महिने पाच दिवस चाललेल्या आंदोलनामुळे पोवनी कोळसा खाणीचे उत्पादन आंदोलकांनी बंद पाडले होते. दरम्यान, या परिसरात प्रवेशाला निर्बंध घालणारा आदेश जारी करण्यात आला होता. हा मनाई हुकूम मागे घेण्याचे आणि व्यवस्थापनाने दाखल केलेला नुकसान भरपाईचा दावा परत करण्याचे मान्य करण्यात आले. पोवनी दोन व पोवनी तीन प्रकल्प एकाचवेळी सुरू झाले होते. त्यामुळे दोन्ही खाण परिसरातील प्रकल्पग्रस्तांना सारखा न्याय व नुकसानभरपाई देण्याची मागणी वेकोलिने मान्य केली. त्यानुसार प्रकल्पात गेलेल्या शेतीला कोरडवाहू ८ लाख रुपये तर ओलीत जमिनीला १० लाख मोबदला देण्यासाठी कोल इंडियाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
तसेच वाढीव मोबदला देण्याचहीे मान्य करण्यात आले. स्थानिक बेरोजगारांना खाणीत रोजगार मिळावा आणि शेतकरी, प्रकल्पग्रस्तांना वेकोलि क्षेत्रीय कार्यालयात सन्मानाची वागणूक देण्याच्या प्रश्नावरही व्यवस्थापनाने संमती दर्शविली.
माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, उपविभागीय पोलीस अधिकारी देशमुख, तहसीलदार डॉ. होळी, कार्यकारी मुख्य महाव्यवस्थापक सिंग, जी. पुलय्या आदींनी उपोषणकर्त्यांना निंबूपाणी देऊन उपोषणाची सांगता केली. यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

Web Title: POWANI PROJECT PROJECTS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.