वीज वितरण विभागाने स्थानिक समस्या तातडीने सोडवाव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:20 AM2021-07-01T04:20:33+5:302021-07-01T04:20:33+5:30

राजुरा : राजुरा तालुक्यातील मौजा रामपूर, धोपटाळा, सास्ती, गोवरी, माथरा व परिसरातील अनेक गावांमध्ये वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक ...

The power distribution department should solve local problems immediately | वीज वितरण विभागाने स्थानिक समस्या तातडीने सोडवाव्यात

वीज वितरण विभागाने स्थानिक समस्या तातडीने सोडवाव्यात

googlenewsNext

राजुरा : राजुरा तालुक्यातील मौजा रामपूर, धोपटाळा, सास्ती, गोवरी, माथरा व परिसरातील अनेक गावांमध्ये वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त होते. आमदार सुभाष धोटे यांच्याकडे वीज समस्यांबाबत त्यांनी पाठपुरावा केला असता, याची दखल घेऊन त्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी या सर्व परिसरातील वीज समस्येवर चर्चा घडवून आणली.

यात परिसरासाठी स्वतंत्र फिडरची निर्मिती करणे, नवीन विद्युतीकरण करणे, खराब व वाकलेले खांब दुरुस्ती करणे, लाइनमनबाबतच्या तक्रारींचे तातडीने निवारण करणे, ज्या शेतकर्‍यांनी कृषिपंप वीजबिलाचा भरणा केला आहे, त्याची वीज जोडणी तातडीने करण्यात यावी, याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. क्षेत्रातील वीज समस्येचे निवारण न झाल्यास, मुख्य समस्यांबाबत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे बैठक आयोजित करून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू, असे आमदार सुभाष धोटे यांनी विश्रामगृह, राजुरा येथे आयोजित बैठकीत जाहीर केले.

याप्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, वीज वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता महेश तेलंग, उपकार्यकारी अभियंता संतोष लोहे, कनिष्ठ अभियंता (जेई) अमित ठमके, विवेक ठाकरे, धोपटाळाचे सरपंच राजू पिंपळशेंडे, सास्तीचे रमेश पेटकर, रामपूरचे वंदना गौरकर, माजी सरपंच राजाराम येल्ला, लहू चहारे, रमेश कुडे, प्रा.प्रफुल्ल शेंडे, ग्रा.प. सदस्य जगदीश बुटले, रमेश झाडे, ब्रिजेश जंगीतवार व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: The power distribution department should solve local problems immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.