भद्रावतीत वीज वितरण कार्यालयाला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:25 AM2021-02-08T04:25:09+5:302021-02-08T04:25:09+5:30

भद्रावती: राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी आधी कोरोना काळातील वीज बिले माफ करण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यानंतर त्यांनी घुमजाव केले. वीज वितरण ...

The power distribution office in Bhadravati was locked | भद्रावतीत वीज वितरण कार्यालयाला ठोकले कुलूप

भद्रावतीत वीज वितरण कार्यालयाला ठोकले कुलूप

googlenewsNext

भद्रावती: राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी आधी कोरोना काळातील वीज बिले माफ करण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यानंतर त्यांनी घुमजाव केले. वीज वितरण कंपनीही ग्राहकांना अवास्तव बिले पाठवून कोरोना प्रादुर्भावात आधीच हतबत झालेल्या ग्राहकांना आणखी आर्थिक खाईत लोटले. त्याच्या निषेधार्थ भद्रावती येथील भाजपा का‌र्यकर्त्यांनी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात ताला ठोको आंदोलन केले.

वीज वितरण कंपनीतर्फे ग्राहकांच्या मागे वीज बिल भरण्यासाठी तगादा लावत वीज बिल न भरल्यास कनेक्शन तोडण्याची नोटीसही बजावली आहे. ग्राहकांवर एवढा अन्याय कंपनीकडून केल्या जात असतानाही राज्यातील आघाडी सरकार मात्र शांतपणे गूग गाळून सर्व तमाशा पाहत आहे. त्यामुळे ग्राहकांचे कोरोना काळातील वीज बिल माफ करण्याची मागणी करीत भद्रावती भारतीय जनता पक्षातर्फे स्थानिक विज वितरण कार्यालयासमोर कंपनीच्या विरोधात निदर्शने करीत कंपनीच्या मुख्य गेटला ताला ठोकण्यात आला. यावेळी राज्यातील आघाडी सरकारचा निषेध करून शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या व वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपचे चंद्रकांत गुंडावार, प्रवीण सातपुते, किशोर गोवारदीपे, नरेंद्र जीवतोडे, विजय वानखेडे, विद्या कांबळे, प्रणिता शेंडे, लता भोयर, सुनंदा माणुसमारे, प्रशांत डाखरे, इम्रान खान, अमित गुंडावार, माधव बांगडे, केतन शिंदे, अनंता ताठे, योगेश गाडगे व अन्य भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: The power distribution office in Bhadravati was locked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.