घोडपेठ ग्रामपंचायतीवर ग्रामविकास शेतकरी पॅनलची सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:25 AM2021-02-15T04:25:20+5:302021-02-15T04:25:20+5:30
भद्रावती : एकूण ११ सदस्य असलेल्या तालुक्यातील घोडपेठ या मोठ्या ग्रामपंचायतीवर काँग्रेस नेते रवींद्र शिंदे यांच्या नेतृत्वात काँग्रेसप्रणीत ग्रामविकास ...
Next
भद्रावती :
एकूण ११ सदस्य असलेल्या तालुक्यातील घोडपेठ या मोठ्या ग्रामपंचायतीवर काँग्रेस नेते रवींद्र शिंदे यांच्या नेतृत्वात काँग्रेसप्रणीत ग्रामविकास शेतकरी पॅनलची सत्ता बसली.
यामध्ये सरपंच अनिल खडके तर उपसरपंच प्रदीप देवगडे झाले.
या सत्तास्थापनेत काँग्रेसच्या अनिल खडके, ईश्वर निखाडे, ज्योती मोरे, बावने या चार सदस्यांचा समावेश आहे.
भारतीय जनता पक्षाचे प्रदीप देवगडे, बोबडे या दोघांनी बंडखोरी केली व कांग्रेसप्रणीत ग्रामविकास शेतकरी पॅनलमध्ये सहभागी झाले. अशाप्रकारे एकूण सहा सदस्यांची मिळून सत्ता स्थापन झाली. तालुक्यात या ग्रामपंचायत सत्तानिवडीकडे दिग्गजांचे लक्ष लागून होते.