सत्य, सकारात्मक विचार हीच पत्रकारितेची शक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 11:33 PM2017-08-06T23:33:58+5:302017-08-06T23:35:02+5:30

वसा ते व्यवसाय हे परिवर्तन स्वीकारणाºया पत्रकारितेचा दबदबा आजही या व्यवसायातील सकारात्मक वृत्तीवर टिकून आहे.

The power of journalism is the truth, the positive thinking is the power of journalism | सत्य, सकारात्मक विचार हीच पत्रकारितेची शक्ती

सत्य, सकारात्मक विचार हीच पत्रकारितेची शक्ती

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : श्रमिक पत्रकार संघाच्या स्पर्धा पुरस्काराचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वसा ते व्यवसाय हे परिवर्तन स्वीकारणाºया पत्रकारितेचा दबदबा आजही या व्यवसायातील सकारात्मक वृत्तीवर टिकून आहे. त्यामुळे सभोवताली कितीही नकारात्मकता वाढली तरी तुमची वाटचाल सकारात्मकतेवर असू द्या, पत्रकारितेची तीच शक्ती आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या स्पर्धा पुरस्काराचे रविवारी प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहात पार पडले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार संजय राऊत, आ. सुरेश धानोरकर, ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गांवडे, महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुनील देशपांडे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद काकडे व सचिव प्रशांत विघ्नेश्वर उपस्थित होते.
पत्रकारितेतील नकारात्मक शक्तीबद्दल चिंता व्यक्त करीत ना. मुनगंटीवार यांनी ‘आजकाल मी वर्तमानपत्र वाचने बंद केले’ अशा प्रतिक्रिया ऐकायला येतात. ही बाब या व्यवसायासाठी चिंताजनक आहे. बातमी विरोधात असो अथवा एखाद्याच्या बाजूने, मात्र बातमीचा गाभा सत्य असावा. बातमी कोणत्याही परिस्थितीत सत्यावर आधारीत असली पाहिजे. बातमीत सत्य असेल तर मग तुम्हाला कोणाचीच भिती ठेवण्याची गरज नाही. अन्य व्यवसायाप्रमाणे या व्यवसायातही नकारात्मक शक्ती मोठया प्रमाणात एकवटत आहे. मात्र माझी बाजू सत्याची असून अशी भूमिका असली पाहिजे. अशाच पत्रकारांची पत्रकारिता बहरते व फुलते असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पत्रकारांच्या अनेक मागण्यांवर सकारात्मक निर्णय होत असून स्थानिक समस्या आगामी काळात सोडविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी अन्य मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रमोद काकडे यांनी तर आभार प्रशांत विघ्नेश्वर यांनी मानले.
यांना मिळाले पुरस्कार
यावेळी पत्रकार संघातर्फे प्रतिष्ठित मानला जाणारा कर्मवीर सन्मान पुरस्कार जेष्ठ पत्रकार मोहन रायपूरे यांना सपत्नीक प्रदान करण्यात आला. तर शुभवार्ता पुरस्कार राकेश गोविंदवार, मानवी स्वारस्य अभिरुची कथा पुरस्कार संदीप रायपूरे व निलेश झाडे यांना संयुक्तरित्या देण्यात आला. तसेच हौशी वृत्तछायाचित्र पुरस्कार राहुल चिलगीलवार, उत्कृष्ठ वृत्तांकन (टिव्ही) पुरस्कार अनवर शेख तर ग्रामीण वार्ता पुरस्कारामध्ये लोकमतचे पोंभुर्णा येथील शहर प्रतिनिधी विराज मुरकुटे यांना प्रथम, व्दितीय रविंद्र नगराळे, तृतीय जितेंद्र सहारे तर प्रोत्साहनपर पुरस्कार प्रा.डॉ.धनराज खोनोरकर व रवि शेंडे यांना देण्यात आला.
मराठी पत्रकारितेचा झेंडा देशभर : संजय राऊत
पत्रकारिता, साहित्य व सामाजिक क्षेत्रात चंद्रपूर शहराचा मोठा ठसा महाराष्ट्रावर उमटला आहे. पत्रकारितेचा गाभा मनातली तळमळ, वेदना असते. अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या सोप्या शब्दात बातमीचे लेखन झाले पाहिजे. त्यांचे संपूर्ण साहित्य अगदी सोप्या भाषेत सामान्यांच्या वेदना व्यक्त करतात. पत्रकारांची भाषा देखील अशीच सामान्यांच्या वेदनेचा वेध घेणारी असली पाहिजे. पत्रकारांनी आपल्या समस्यांवर नक्कीच बोलावे, मात्र पत्रकारिता हाच आपला धर्म असल्याचे विसरु नये. लेखन ही आपली ओळख असते. त्यामुळे हातातला पेन आणि त्यातून उमटणारे मनातील शब्दांना अन्य कितीही माध्यम आली तरी येणाºया काळातही पर्याय असणार नाही. आजही आम्हाला समाजावर प्रभाव टाकणारी पत्रकारिता म्हणून लोकमान्य टिळक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचेच नाव घ्यावे लागते. पुढच्याही काळात मुद्रीत माध्यमांची ताकद कायम राहणार असून ग्रामीण पत्रकारांनी हे बळ वृत्तपत्रांना दिले आहे. म्हणूनच मराठी पत्रकारितेचा झेंडा देशभर टिकून असल्याचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

Web Title: The power of journalism is the truth, the positive thinking is the power of journalism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.