बेंबाळ-नांदगाव परिसरात विजेचा लपंडाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:37 AM2021-06-16T04:37:58+5:302021-06-16T04:37:58+5:30
बेंबाळ-नांदगाव परिसरात दर एक ते दोन तासाला किंवा वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असतो. वातावरण खराब असो किंवा नसो ...
बेंबाळ-नांदगाव परिसरात दर एक ते दोन तासाला किंवा वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असतो. वातावरण खराब असो किंवा नसो विद्युत पुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून ग्राहकांना सुरळीत विद्युत पुरवठा करणे महावितरण कंपनीचे काम आहे. तरी परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा व विद्युत ग्राहकांना चांगली सुविधा द्यावी करिता उलगुलान संघटनेचे जिल्हा संयोजक प्रशांत उराडे यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालय सावली येथे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना संघटनेचे जिल्हा संयोजक प्रशांत उराडे, उपाध्यक्ष किशोर पगडपल्लिवार, आकाश दहिवले, अजय भसारकर, वसंत चौधरी, सचिन कस्तुरे तथा अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
===Photopath===
150621\img-20210615-wa0069.jpg
===Caption===
बेंबाळ- नांदगाव परिसरात विजेचा सततचा लपंडाव