सिंदेवाही तालुक्यात विजेचा लपंडाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:28 AM2021-09-03T04:28:07+5:302021-09-03T04:28:07+5:30
विद्युत विभागाच्या भोंगळ कारभारामुळे दिवसातून कित्येक वेळा लाईट जाते. त्यामुळे शेतकरी शेतीला बरोबर पाणी देऊ शकत नाही. परिणामी धान ...
विद्युत विभागाच्या भोंगळ कारभारामुळे दिवसातून कित्येक वेळा लाईट जाते. त्यामुळे शेतकरी शेतीला बरोबर पाणी देऊ शकत नाही. परिणामी धान पिकाचे नुकसान होत आहे. शेतकऱ्याला रात्री बेरात्री शेतावर जावे लागते. आधीच वाघाची भीती आहे. त्यामुळे एखादा अपघातही घडू शकतो.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिकविल्या जात आहे. पण विजेच्या लपंडावामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुद्धा मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. अशाच पद्धतीने जर विजेचा लपंडाव सुरू राहिला तर शिवसेना आपल्या शिवसेना स्टाईलने आंदोलन करेल, असे निवेदन विद्युत विभागाच्या कनिष्ठ अभियंता यांना देण्यात आले. यावेळी निवेदन देताना युवासेनेचे जिल्हा प्रमुख आशिष चिंतलवार, देवेंद्र मंडलवार, पंकज ननेवार, विकास आदे, प्रीतम नागोसे, दुर्वास मंडलवार, किसन मुळेवार उपस्थित होते.