सिंदेवाहीत विजेचा लपंडाव, नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:34 AM2021-09-10T04:34:14+5:302021-09-10T04:34:14+5:30
विद्युत विभागाच्या गलथान कारभाराचा फटका सर्वात जास्त ग्रामीण जनतेला बसत आहे. सिंदेवाही येथे १३२ केव्ही असूनही छोट्या बिघाडामुळे वीजपुरवठा ...
विद्युत विभागाच्या गलथान कारभाराचा फटका सर्वात जास्त ग्रामीण जनतेला बसत आहे. सिंदेवाही येथे १३२ केव्ही असूनही छोट्या बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. सिंदेवाही तालुक्यात एकही उद्योग नाही. शहराची लोकसंख्या वाढली असली तरी विजेची मागणी पाहिजे त्या प्रमाणात नाही. तरी त्याचा फटका शहरातील लोकांना बसत आहे. रात्री विजेचा दाब कमी होत असल्याने विद्युत उपकरणे खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. कमी दाब व वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. मात्र, वीजपुरवठा खंडित झाला की यंत्रणा बंद पडते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तरीही वीज बिल भरमसाठ येत आहे. वीजपुरवठा सुरळीत होत नसेल तर महावितरण कंपनीने वीज देयकेसुद्धा वाटू नये असा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे.