शक्तीप्रदर्शन आणि नामांकन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 09:51 PM2019-03-25T21:51:40+5:302019-03-25T21:51:57+5:30
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा निवडणुकीसाठी आज नामांकन दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे उमेदवार व त्यांंच्या समर्थकांची नामांकनसाठी चांगलीच गर्दी उसळली. भाजपा-शिवसेना-रिपाइं (आ.) युतीचे उमेदवार हंसराज अहीर यांनी रॅलीच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करीत आपले नामांकन दाखल केले. तर काँग्रेस-राकॉ-पिरिपा युतीचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी आधी नामांकन दाखल केले, नंतर रॅली काढून आपली ताकद दाखविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा निवडणुकीसाठी आज नामांकन दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे उमेदवार व त्यांंच्या समर्थकांची नामांकनसाठी चांगलीच गर्दी उसळली. भाजपा-शिवसेना-रिपाइं (आ.) युतीचे उमेदवार हंसराज अहीर यांनी रॅलीच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करीत आपले नामांकन दाखल केले. तर काँग्रेस-राकॉ-पिरिपा युतीचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी आधी नामांकन दाखल केले, नंतर रॅली काढून आपली ताकद दाखविली. बहुजन वंचित आघाडीचे राजेंद्र महाडोळे यांनी यापूर्वीच नामांकन सादर केले आहे. मात्र आज मिरवणुकीतून त्यांनीही शक्तीप्रदर्शन केले.
भाजपाचे उमेदवार हंसराज अहीर यांचे नामांकन दाखल करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅली काढण्यात आली. यावेळी राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, गृह राज्यमंत्री रणजित पाटील, वर्धेचे खासदार रामदास तडस, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आ. नाना श्यामकुळे, आ. अॅड. संजय धोटे, आर्णीचे आ. राजू तोडसाम, आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुरेश सावंत, रमेश देशमुख, दिलीप कपूर, रिपाइं (आ.)चे जिल्हाध्यक्ष अशोक घोटेकर, माजी पालकमंत्री संजय देवतळे, यवतमाळ जिल्हा भाजपा अध्यक्ष राजेंद्र डांगे, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा नेते राजेंद्र गांधी, हरीश शर्मा, ब्रिजभुषण पाझारे, शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिºहे, नितीन मत्ते, राजेश नायडू, रिपाइं (आ) जयप्रकाश कांबळे, राजू भगत, महापौर अंजली घोटेकर, यांच्यासह युती पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, जि.प., पं.स. सभापती व सदस्य, नगरसेवक व इतर लोकप्रतिनिधींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेस-राकाँचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी सर्वप्रथम दुपारी १ वाजता काही निवडक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात जावून आपले नामांकन दाखल केले.
त्यानंतर दुपारी २ वाजताच्या सुमारास येथील सोमेश्वर मंदिर परिसरातून काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी करीत आपली ताकद दाखवून दिली. या मिरवणुकीत आ. विजय वडेट्टीवार, माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर, अॅड. बाबासाहेब वासाडे, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष नंदू नागरकर आणि राजुरा, बल्लारपूर, मूल, वणी, आर्णी व चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
एकूण २१ नामांकन दाखल
यापूर्वी दोन नामांकन दाखल झाले होते. सोमवारी अखेरच्या दिवशी भाजापाचे हंसराज अहीर, काँग्रेसचे बाळू धानोरकर यांच्यासह अन्य १९ उमेदवारांनीही आपल्या समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन नामांकन दाखल केले. यामध्ये अपक्ष मिलिंद प्रल्हाद दहीवले, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीतर्फे अॅड. भूपेश वामन रायपुरे, आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियातर्फे नितेश आनंदराव डोंगरे, अपक्ष अरविंद नानाजी राऊत, अपक्ष नामदेव केशव किन्नाके, प्राऊटिस्ट ब्लॉक इंडियातर्फे मधुकर विठ्ठल निस्ताने, वंचित बहुजन आघाडीतर्फे राजेंद्र श्रीरामजी महाडोळे (दुसरा अर्ज), इंडियन नॅशनल काँग्रेसतर्फे सुरेश नारायण धानोरकर, भारतीय जनता पार्टीतर्फे हंसराज गंगाराम अहीर ( चार अर्ज ), बहुजन मुक्ती पार्टीतर्फे गौतम गणपत नगराळे ( तीन अर्ज), नव समाज पक्षातर्फे विद्यासागर कालिदास कासर्लावार (दोन अर्ज), अपक्ष राजेंद्र कृष्णराव हजारे, बहुजन समाज पार्टी सुशील संगोजी वासनिक, अपक्ष रमेश मारोतराव कडुकर, गोंडवाना गणतंत्र पार्टीतर्फे नामदेव माणिकराव शेडमाके, अपक्ष शैलेश भाऊराव जुमडे, अपक्ष अभिजित राजू बेल्लालवार, अपक्ष अशोकराव तानबाजी घोडमारे, अपक्ष अभिनंदन महादेव भेंडाळे, भारतीय मानवाधिकार पार्टीतर्फे दामोदर श्रीराम माथने यांचा समावेश आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीसाठी एकूण २१ नामांकन अर्ज दाखल झाले आहेत.
वंचित बहुजन आघाडीचीही रॅली
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेंद्र महाडोळे यांनी काही दिवसांपूर्वीच आपले नामांकन दाखल केले. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने आज सोमवारी रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. आज सकाळी ११ वाजता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूतळ्यापासून रॅलीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
आज नामांकन अर्जांची छाननी
नामनिर्देशन पत्रांची छाननी २६ मार्च रोजी सकाळी ११ वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुरू करण्यात येईल. ज्या उमेदवारांना आपले अर्ज मागे घ्यायचे असेल त्यांना २८ मार्च रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात तसा अर्ज सादर करता येईल. २९ मार्चला उमेदवारांच्या अंतिम यादीची घोषणा होणार असून प्रचाराची अंतिम तारीख ९ एप्रिल आहे.