वीज पुरवठा अखंडित सुरू ठेवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:28 AM2021-07-29T04:28:33+5:302021-07-29T04:28:33+5:30

वाढत्या महागाईने नागरिक त्रस्त चंद्रपूर : मागील काही दिवसांमध्ये सातत्याने महागाई वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीस आले आहेत. ...

Power supply should be kept uninterrupted | वीज पुरवठा अखंडित सुरू ठेवावा

वीज पुरवठा अखंडित सुरू ठेवावा

Next

वाढत्या महागाईने नागरिक त्रस्त

चंद्रपूर : मागील काही दिवसांमध्ये सातत्याने महागाई वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीस आले आहेत. महागाई कमी करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पेट्रोल-डिझेलचे भावही सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे प्रवासी भाड्यामध्येही वाढ झाली आहे.

रिक्त पदे भरण्याची मागणी

चंद्रपूर : विविध शासकीय कार्यालयातील रिक्त पदे भरून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या अनेक वर्षांत अनुकंपातत्त्वावरील पदे भरण्यात आली नाहीत. त्यामुळे अनुकंपाधारकांना अडचण होत आहे. त्यामुळे ही पदेही भरण्याची मागणी केली जात आहे.

बेरोजगारांमध्ये निराशा

चंद्रपूर : काही वर्षांपासून नोकरभरती झाली नसल्याने बेरोजगारांमध्ये नैराश्य पसरले आहे. त्यातच विविध बँकांकडून सहजासहजी कर्जच मिळत नसल्याने त्यात भर पडत आहे. काही तालुक्यांमध्ये उद्योग नसल्याने युवकांमध्ये निराशा पसरत आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.

उघड्यावरील अन्नपदार्थांकडे दुर्लक्ष

चंद्रपूर : सध्या पावसाचे दिवस सुरू आहे. त्यातच शहरात अस्वच्छतेच्या वातावरणात अन्नपदार्थांची विक्री केली जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. खाद्यपदार्थ विक्रीच्या दुकानांची तपासणी करताना चालढकल केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा

चंद्रपूर : शहरातील अनेक प्रभागांत मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरू आहे. रात्री पाठलाग करण्याच्या घटना वाढू लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत. यासोबतच पठाणपुरा, हॉस्पिटल वाॅर्ड, रामनगर आदी परिसरातही मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. महानगरपालिकेने विशेष पथक पाठवून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे़.

बाबू पेठमधील अनेक भागात अंधाराचे साम्राज्य

चंद्रपूर : बाबू पेठ परिसरातील अनेक भागातील पथदिवे बंद राहतात. त्यामुळे या परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. येथील नागरिकांनी अनेकदा याबाबत तक्रार केली. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष देऊन समस्या सोडवावी, अशी मागणी आहे.

--

ग्रामीण रस्त्यांची दुरुस्ती करावी

चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विविध रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. गावखेड्यातील रस्त्यांची थातूरमातूर कामे केल्याने दैनावस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले. त्यामुळे ये-जा करणाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय, अपघाताच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.

जनावरांना टॅग लावण्याची मागणी

चंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश नागरिक शेतीवरच उदरनिर्वाह करतात. आता दुधाळ जनावरांचे पालन करण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व जनावरांना टॅग लावून नोंदणी करावी, अशी मागणी पशुपालकांनी केली आहे.

रोजगाराला चालना द्यावी

चंद्रपूर : जिल्ह्यातील युवकांना रोजगार मिळावा, यासाठी शासनाने तालुकास्तरावर जागा उपलब्ध करून दिली. मात्र, काही तालुक्यात उद्योगाचा पत्ता नाही. त्यामुळे तालुक्यात बेरोजगारांची संख्या वाढत असून स्थानिक युवकांना रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे. सिंदेवाही, नागभीड तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. मात्र, धानावर आधारित उद्योग नसल्याने युवकांच्या हाताला काम मिळत नसल्याची स्थिती आहे.

Web Title: Power supply should be kept uninterrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.