वीज कामगार, अभियंत्यांचे सोमवारी कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:27 AM2021-05-23T04:27:38+5:302021-05-23T04:27:38+5:30
१५ मे रोजी झालेल्या ऑनलाईन बैठकीत वीज कामगार, अभियंत्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देवून लसीकरण करण्याची मागणी करण्यात आली. परंतु, ...
१५ मे रोजी झालेल्या ऑनलाईन बैठकीत वीज कामगार, अभियंत्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देवून लसीकरण करण्याची मागणी करण्यात आली. परंतु, याकडे दुर्लक्ष केल्याने शेकडो वीज कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक कुटुंबीय बाधित झाले आहेत. त्यामुळे वीज कामगार, अभियंत्यांचे लसीकरण करावे, कोरोनाने मृत्यू झालेल्या कामगारांना ५० लाख रुपयांचे अनुदान द्यावे, तिन्ही कंपन्याकरिता एम.डी. इंडिया या जुन्या टिपीएची तात्काळ नेमूणक रावी, कोरोनाची स्थिती बघता वीजबिल वसुलीची सक्ती करु नये, आदी मागण्यांसाठी सोमवारपासून कामबंद आंदोलन करण्यात येत असल्याचे महा. स्टेट इले. वर्कस फेडरेशनचे सरचिटणीस कृष्णा भोयर, वीज कामगार महासंघाचे शंकर पहाड, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे आर. टी. देवकांत, सबॉर्डीनेट इंजि असोसिएशनचे संजय ठाकूर, वीज तांत्रिक कामगार युनियनेचे सैय्यद जहिरोद्दीन, राज वीज कामगार कॉंग्रेसचे इंटकचे दत्तात्रेय गुट्टे आदींनी कळविले आहे.