पोवनी कोळसा खाण चौथ्या दिवशीही बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 11:41 PM2018-07-09T23:41:17+5:302018-07-09T23:41:49+5:30

संततधार पडत असलेल्या पावसाने राजुरा तालुक्यातील वेकोलिची पोवनी-२ खुल्या कोळसा खाणीत पुराचे पाणी शिरल्याने आज चौथ्या दिवशीही खदान बंद होती. त्यामुळे दररोज वेकोलिला लाखो रुपयाचा फटका बसत आहे.

POWNEY KOLA MINE closed on the fourth day | पोवनी कोळसा खाण चौथ्या दिवशीही बंद

पोवनी कोळसा खाण चौथ्या दिवशीही बंद

Next
ठळक मुद्देउत्पादन ठप्प : चार दिवस खाण बंद राहणार

लोकमत न्यूज नेटवर्क
सास्ती : संततधार पडत असलेल्या पावसाने राजुरा तालुक्यातील वेकोलिची पोवनी-२ खुल्या कोळसा खाणीत पुराचे पाणी शिरल्याने आज चौथ्या दिवशीही खदान बंद होती. त्यामुळे दररोज वेकोलिला लाखो रुपयाचा फटका बसत आहे.
वेकोलि बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणारी राजुरा तालुक्यातील पोवनी-२ ही नवी कोळसा खाण आहे. चार-पाच दिवसापासून संततधार पाऊस पडत असल्याने पुराचे पाणी या कोळसा खदानीत शिरले. कोळसा खाणीत पाणी येत असल्याचा अंदाज येताच वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी लाखो रुपयाच्या महागड्या मशीन तातडीने कोळसा खाणीतून बाहेर काढल्याने त्या मशीन खदानीतील पाणञया बुडण्यापासून वाचल्या. या कोळसा खाणीत दररोज लाखो रुपयाच्या कोळसाचे उत्पादन घेतले जाते. दिवसरात्र कोळसा खाणीत कामगरांचे आवागमन होते. मात्र समयसुचकता दाखवित वेकोलिच्या अधिकाºयांनी कामगारांना कोळसा खाणीतून बाहेर येण्याच्या सुचना दिल्या. त्यामुळे सर्व वेकोलि कामागरांना कोळसा खाणीतून सुखरूप बाहेर येता आले.
पावसामुळे आज चौथ्या दिवशीही वेकोलिची पोवनी-२ कोळसा खाण बंद असल्याने वेकोलिला दररोज लाखो रुपयाचा फटका बसत आहे. याबाबत पोवनी २ कोळसा खाणीचे सब एरिया मॅनेजर सी.पी. सिंग यांचेशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, ते म्हणाले की मोटारपंपाद्वारे खदानीतील पाणी काढण्याचे काम सुरू असून पुन्हा चार ते पाच दिवस कोळसा खाणीतील कामकाज ठप्प राहणार आहे.
अधिकाऱ्यांच्या सर्तकतेमुळे वाचल्या महागड्या मशीन
कोळसा खाणीत पाणी येत असल्याचे लक्षात येताच वेकोलि अधिकाºयांनी कर्मचाºयांना कोळसा खाणीतून बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे लाखो रुपयांच्या महागड्या मशीन कोळसा खाणीत बुडण्यापासून वाचल्या.

Web Title: POWNEY KOLA MINE closed on the fourth day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.