रावण दहनाची प्रथा बंद करा; आदिवासींची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 10:28 PM2018-10-10T22:28:51+5:302018-10-11T12:38:36+5:30
महात्मा राजा रावण मानवतावादी समृद्ध व वैभवशाली संस्कृतीचे प्रतिक आहे. निसर्ग रक्षक, उत्कृष्ट समाज व्यवस्थेचा उद्गाता, समान न्याय देणारा न्यायप्रिय राजा असलेल्या आदिवासींच्या राज्याची षडयंत्रकारी सनातनी व्यवस्थेनी परंपरेच्या नावाखाली प्रतारणा चालविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : महात्मा राजा रावण मानवतावादी समृद्ध व वैभवशाली संस्कृतीचे प्रतिक आहे. निसर्ग रक्षक, उत्कृष्ट समाज व्यवस्थेचा उद्गाता, समान न्याय देणारा न्यायप्रिय राजा असलेल्या आदिवासींच्या राज्याची षडयंत्रकारी सनातनी व्यवस्थेनी परंपरेच्या नावाखाली प्रतारणा चालविली आहे. आदिवासी संस्कृतीचे प्रतिक संवर्धनाऐवजी संपविण्याचा प्रकार होत असून आदिवासींच्या समुहाचा अवमान थांबविण्यासाठी ‘रावण’ दहन प्रथा कायमची बंद करण्याची आर्त हाक अनुसूचित जमाती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिली आहे.
आर्गनायझेशन फॉर राईट आॅफ ट्रायबल संघटनेने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या नावानी येथील उपविभागीय कार्यालयातील नायब तहसीलदार सी. बी. तेलंग यांच्याकडे निवेदन सादर करून आग्रही मागणी केली. आदिवासी समाजात राजा रावण महान आहे. महापराक्रमी राजाचा इतिहास भावी पिढीला माहित होवू नये व महान यौद्धांची प्रतीमा डागाळण्याच्या अनुषंगाने दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करण्याची प्रथा जाणीवपूर्वक सनातन समाज व्यवस्थेनी सुरू केली आहे. याला आदिवासी समाजाचा विरोध आहे.
आजही देशातील दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यात महात्मा रावणाची ३५२ मंदिरे असून राजाची पूजा केली जाते. छत्तीसगड, मध्यप्रदेश, झारखंड व राज्याच्या मेळघाट तालुक्यात भक्तीभावाने राजा रावणाची पूजा अर्चना केली जात असून आदिवासींच्या महान राज्याची स्मृतीला अभिवादन केले जात आहे. मात्र सनातनी व्यवस्थेला बळकट करण्यासाठी ‘रावण’ दहन केले जाते. यामुळे आदिवासींच्या भावना दु:खावल्या जात असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने ‘रावण’ दहन रूढी कायमची बंदी करावी, अशी मागणी सादर केलेल्या निवेदनातून आदिवासी समाज बांधवांनी केली.
येथील उपविभागीय कार्यालयात नायब तहसीलदार सी.बी. तेलंग यांना निवेदन सादर करणाºया शिष्टमंडळात प्रल्हाद कोटनाके, सुनील कुमरे, सुरेश कुळसंगे, सुनील कावे, वंदना कुळसंगे, विनोद कन्नाके, शालिनी कोवे आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
‘त्या’ कविताकारावर गुन्हा दाखल करावा
आदिवासी समाजातील मुलींच्या शारीरिक क्षमतेविषयी व अश्लिल शब्द प्रयोगाद्वारे अपमान करण्यात आला आहे. यामुळे समाजात तिव्र संताप व्यक्त केला जात आहे. दिनकर मनवर यांच्या ‘दृष्य नसलेल्या दृष्यात’ कविता संग्रहात ‘पाणी कस असत’ या कवितेच्या माध्यमातून समाजातील महिला विषयी आक्षेपाहार्य लिखान करण्यात आले. मुंबई विद्यापीठात त्यांचा समावेश करण्यात आला. या प्रकरणामुळे समाज बांधव संतापले असून संबंधित लेखकांसह, प्रकाशक व विद्यापीठावर प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने ठाणेदारांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
देवाडा : रावण दहन प्रक्रियेने आदिवासी समाजाच्या भावना दुखविण्याच्या प्रयत्न होत असल्याने सदर प्रथा बंद करण्याच्या मागणीचे निवेदन गोंडवाना गणतंत्र पार्टी देवाडाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख व पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांना देण्यात आले. निवेदन देणाºया शिष्टमंडळात वेळी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हा संघटक बापूराव मडावी, संजय आत्राम, घनश्याम मेश्राम अमृतराव आत्राम, मारोती मेश्राम, भिमराव सिडाम, विशााल मेश्राम, जंगु सिडाम, गुलाब मेश्राम, व आदिवासी समाजबांधव उपस्थित होते.
आॅल इंडिया फेडरेशनचे
एसडीपीओंना निवेदन
चिमुर : आदिवासी समाजाची भावना दुखावणाºया प्रथेवर बंदी लादण्याची मागणी चिमूर येथील आॅल इंडिया आदिवासी एम्पलाईज फेडरेशन चिमूर शाखेच्या वतीने एसडीपीओ, ठाणेदार, तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देणाºया शिष्टमंडळात तिरूमाल मनोजसिंह, गोंड मडावी, दिलीप वटे, जिवन येरमे, प्रकाश कोडापे, दीपक कुंभरे, मारोती मसराम, रितूराज आत्राम, नंदू सोयाम यांच्यासह आॅल इंडिया आदिवासी एम्पलाईज फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.