महिलांना समानतेची वागणूक दिली तरच प्रगती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 10:35 PM2018-07-24T22:35:42+5:302018-07-24T22:36:04+5:30
बहुजनांची संस्कृती कोणती होती, हे समजणे स्त्रियांच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. ही संस्कृती समानतेवर आधारित आहे. महिलांना सन्मानाचा दर्जा होता. परंतु बहुजनांच्या सिंधु संस्कृतीवर हल्ला करून नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे महिलांना हीन लेखून दुय्यम दर्जा देण्याची परंपरा निर्माण करण्यात आली. हा प्रकार लोकशाही मूल्यरचनेसाठी गंभीर असून महिलांना समतेची वागणूक दिली तरच खऱ्या अर्थाने प्रगती होईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या जिल्हाध्यक्ष शरयू दहाट केले. रविवारी येथे पार पडलेल्या सातव्या जिल्हा अधिवेशनात त्या बोलत होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बहुजनांची संस्कृती कोणती होती, हे समजणे स्त्रियांच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. ही संस्कृती समानतेवर आधारित आहे. महिलांना सन्मानाचा दर्जा होता. परंतु बहुजनांच्या सिंधु संस्कृतीवर हल्ला करून नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे महिलांना हीन लेखून दुय्यम दर्जा देण्याची परंपरा निर्माण करण्यात आली. हा प्रकार लोकशाही मूल्यरचनेसाठी गंभीर असून महिलांना समतेची वागणूक दिली तरच खऱ्या अर्थाने प्रगती होईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या जिल्हाध्यक्ष शरयू दहाट केले. रविवारी येथे पार पडलेल्या सातव्या जिल्हा अधिवेशनात त्या बोलत होत्या.
यावेळी प्रा. प्रभा वासाडे, अॅड. इतिका साहा, संगिता मुलकलवार, निर्मला ठाकूर, निवेदिता कवाडे, शाहिन खान, छाया सोनुले, रजनी मत्ते, डॉ. अभिलाषा गावतुरे उपस्थित होत्या. दहाट म्हणाल्या, महिलांवरील वाढते अत्याचार आणि त्यांची भयावह आकडेवारी चिंताजनक आहे. त्यामुळे सर्व महिलांनी प्रबोधनाच्या राष्ट्रव्यापी संघर्षात सहभागी होणे गरजेचे झाले आहे. याकरिता राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ देशभर व्यापक जनप्रबोधन करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतीय संस्कृती आणि राज्यघटना यातील विविध पैलुंची माहिती त्यांनी दिली. दिवसभर चाललेल्या सत्रांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.
प्रा. वासाडे म्हणाल्या, देशात महिलांची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. पुरुषप्रधान समाजात आता पुरुषांची मानसिकता बदलावी लागणार आहे. ही मानसिकता कशी बनली, याची कारणे काय? ही व्यवस्था कायम ठेवण्याचे षडयंत्र कोण करत आहेत, याचा विचार करण्याची आज गरज आहे. व्यवस्था परिवर्तनाचा लढा पुढे नेल्याशिवाय महिलांची प्रगती होणार नाही. यासाठी चाकोरीच्या बाहेर निघून विविध प्रश्नांवर एकत्र आले पाहिजे, असेही प्रा. वासाडे म्हणाल्या.
महिलांच्या समस्यांवर विचारमंथन करण्यासाठी जिल्ह्यातील शेकडो महिला उपस्थित झाल्या होत्या. ग्रामीण भागातील महिलांनी संविधान व लोकशाही, महिला अत्याचार आदी विषयांवर विचार मांडले. यावेळी पुस्तकांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. संचालन शाहिदा शेख, प्रास्ताविक माया कोसे यांनी केले. कल्पना तेलंग यांनी आभार मानले. कार्यक्रमाप्रसंगी सीमा मेश्राम, मृणालिनी नगराळे, चहारे, शशिकला गावतुरे, ताराबाई वाघधरे, मनिषा भसारकर, अफसाना शेख, वीना पेटकुले, तनवीर सय्यद, संध्या फुलझेले, सपना देशभ्रतार, संगिता भगत, करुणा चालखुरे, दुर्गा वैरागडे, उषा फुलझेले, अरुणा नगराळे, विजय मुसळे, आसुटकर, अनिता देरकर आदी उपस्थित होते.