कोरोनावर ‘प्राणायाम’ची मात्रा प्रभावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:27 AM2021-05-10T04:27:57+5:302021-05-10T04:27:57+5:30

नियमित प्राणायम व योगा केल्यास आपणाला विविध आजारांपासून व व्याधीपासून मुक्ती मिळत असल्याचे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. कुठलेही क्लेष ...

Pranayama is effective on the corona | कोरोनावर ‘प्राणायाम’ची मात्रा प्रभावी

कोरोनावर ‘प्राणायाम’ची मात्रा प्रभावी

Next

नियमित प्राणायम व योगा केल्यास आपणाला विविध आजारांपासून व व्याधीपासून मुक्ती मिळत असल्याचे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. कुठलेही क्लेष न होता मानसिक व शारीरिक आजारावर प्राणायाम आतापर्यंत वरदान ठरले आहे. कोरोना फुफ्फुसावर आघात करतो, आणि व्यक्तीच्या श्वसनक्रियेत अडथळा आणतो. त्यामुळे कोरोनाच्या संकट काळात फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्राणायम महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर सध्याच्या भीतीच्या काळात प्रसन्न मन, सकारात्मक विचार, उत्साह, विश्वास, कार्यक्षमता वाढविण्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे. रुग्णांना कोरोनावर विजय मिळविण्यासाठी सकारात्मक विचाराची गरज आहे. नियमित प्राणायाम केल्याने सकारात्मक भावना निर्माण होत असल्याने कोरोनावर सहज विजय मिळविता येत असल्याचा अनुभवही योग शिक्षकांनी यावेळी व्यक्त केला.

बॉक्स

प्राणायम शिक्षक म्हणतात

योग हा प्राचीन भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे. योग प्राणायाम हा केवळ व्यायाम नसून नियमित व उचित केल्यास अनेक व्याधी दूर होण्यास मदत होत असते. भस्त्रिका, कपालभारती, अनुलोमविलोम, आदी प्रकार केल्याने आपण कोरोनावर मात करू शकतो. मी सुद्धा बाधित झाले होते. मात्र, नियमित प्राणायाम व योगा केल्याने मला कोरोनाचा फार त्रास जाणवला नाही. कोरोनाला हरविण्यासाठी मला प्राणायाम फायदेशीर ठरला.

-वंदना संतोषवार, योग शिक्षिका

-------

कोरोना हा फुफ्फुसावर इजा करीत असतो. आपण जर अनुलोम-विलोम हा योगाचा प्रकार केल्यास आपले फुफ्फुस मजबूत होऊन आपण योग्य प्रकारे कोरोनाशी लढा देऊ शकतो. त्यामुळे दिवसांतून दोन ते तीनवेळा अनुलोम-विलोम हा प्रकार करावा.

-देवश्री जुनघरे, योग साधक

Web Title: Pranayama is effective on the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.