बल्लारपुरात चांदीच्या राखीला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:33 AM2021-08-21T04:33:05+5:302021-08-21T04:33:05+5:30
मंगल जीवने बल्लारपूर : बहीण-भावाच्या अतूट पवित्र नात्याचे बंधन म्हणजेच रक्षाबंधन होय. या पार्श्वभूमीवर शहरातील वस्ती डेपो व टेकडी ...
मंगल जीवने
बल्लारपूर : बहीण-भावाच्या अतूट पवित्र नात्याचे बंधन म्हणजेच रक्षाबंधन होय. या पार्श्वभूमीवर शहरातील वस्ती डेपो व टेकडी विभागात रंगीबेरंगी राख्यांनी दुकाने सजली असून, यंदा मात्र डिजिटल, छोट्यांसाठी कार्टून राखी व चांदीच्या राख्यांचा माहोल दिसत आहे तर काही दुकानदारांनी गुगल पे करा आम्हाला तुमचा भावाचा पत्ता द्या, राखी पाठविण्याची व्यवस्था आमची, अशी सोयही करून दिली आहे.
मागच्या वर्षी राखीचा सण महामंडळाच्या बसेस बंद आणि कोरोना निर्बंधामुळे बहिणींना साजरा करता आला नाही. यामुळे राखी विकणाऱ्या दुकानदारांनाही आर्थिक नुकसान सहन करावे लागले. आता निर्बंध शिथिल झाले असले तरी यंदा मात्र मागचा अनुभव घेऊन बहिणींच्या व मुलांच्या आवडी लक्षात घेत स्टोन राखी, लुम्बा राखी, भय्या-भाभी राखी, मेटल राखी, ए.डी. राखी, कार्ड पॅकिंग राखी, रोली चावल, पूजा थाळी, मौली डोरा, लाल डोरा अशा अनेक प्रकारच्या राख्या बाजारात आल्या असून, कॉम्बो पॅक राखीही उपलब्ध आहे. या राख्यांची किंमत ३० रुपयांपासून, तर १५० रुपयांपर्यंत आहे व चांदीच्या राख्यांची किंमत ४०० पासून पुढे सुरू आहे.
कोट
यंदा राखी सणाचा उत्साह दिसत आहे. तरीही कोरोनाचे निर्बंध पाळून आम्ही बहिणींना दुकानात न येता गुगल पे करून त्यांच्या भावाच्या पत्त्यावर राखी पाठविण्याची व्यवस्था केली आहे. सर्व पूजेच्या साहित्याने सजलेला चांदीच्या राखीचा सीलबंद पॅक असल्यामुळे खप वाढला आहे. हा उपक्रम आम्ही पहिल्यांदाच केला आहे.
-गौरव खंडेलवाल, ज्वेलर्स, बल्लारपूर
कोट
साधारणत: मौली डोरा, लाल डोरा अशा छोट्या राख्यांची मागणी जास्त आहे. मागच्या वर्षी मागविलेला स्टॉक अजूनही आहे. मागणी पाहून नवीन डिजिटल राख्या विक्रीस उपलब्ध आहे. परंतु बाजारात पाहिजे तसा प्रतिसाद दिसत नाही.
- अमित गिडवाणी, बल्लारपूर
200821\rakhi (2).jpg
चांदीच्या व इतर राख्या