महिलांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य -चावडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 10:53 PM2018-08-06T22:53:55+5:302018-08-06T22:54:14+5:30

२१ व्या शतकात महिलांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. अनेक महिला बदनामीपोटी अन्याय सहन करतात. मात्र महिलांनी न घाबरता कायद्यांचा आधार घ्यावा, महिलांचा संरक्षणांसाठी अनेक कायदे तयार करण्यात आले आहेत.

Prefer to solve women's problems - | महिलांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य -चावडा

महिलांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य -चावडा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : २१ व्या शतकात महिलांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. अनेक महिला बदनामीपोटी अन्याय सहन करतात. मात्र महिलांनी न घाबरता कायद्यांचा आधार घ्यावा, महिलांचा संरक्षणांसाठी अनेक कायदे तयार करण्यात आले आहेत. पीडित महिलांना न्यास देण्यासाठी आपण महिलांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष स्मिता चावडा यांनी केले.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. विक्रांत वाघचौरे यांच्या संमतीने तसेच राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी समीर परब यांच्या सहकार्याने स्मिता चावडा यांची चंद्रपूर महिला जिल्हाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. त्यांना नियुक्तीचे पत्र केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. स्मिता चावडा पुढे म्हणाल्या, दिवसेंदिवस भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावर वेळीच आळा घालण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सुजाता बाली,मनीषा शर्मा, रेखा बोबाटे, छाया दुधलकर उपस्थित होते.

Web Title: Prefer to solve women's problems -

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.