कोरोनाच्या सावटात गणेशोत्सवाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:32 AM2021-08-21T04:32:50+5:302021-08-21T04:32:50+5:30
कोरोनाचे सावट असल्यामुळे तसेच तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने सण, उत्सव साजरा करताना प्रशासनाने निर्बंध घालून दिले आहे. यानुसारच ...
कोरोनाचे सावट असल्यामुळे तसेच तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने सण, उत्सव साजरा करताना प्रशासनाने निर्बंध घालून दिले आहे. यानुसारच प्रत्येक उत्सव साजरा करावा लागणार आहे. मूर्ती विकण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे नोंदणी करावी लागणार आहे. पीओपी मूर्तीवर बंदी आहे. या मूर्ती विकण्याचा प्रयत्न केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. तोंडावर असलेला गणेशोत्सवामुळे मूर्तिकारांची सध्या लगबग सुरू आहे. मात्र सार्वजनिक मंडळांनी तसेच घरगुती नागरिक अद्यापपर्यंत बुकिंगकसाठी येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे यावर्षीही आर्थिक नुकसान होईल, अशी भीती मूर्तिकारांना आहे. दरवर्षी गणेशमूर्तींसह आकर्षक देखावे आकर्षणाचे केंद्र असतात. मात्र शासनाच्या निर्बंधामुळे देखावे साकारण्यात यंदाही मंडळांमध्येही निरुत्साह दिसून येत आहेत.
बाॅक्स
यावर्षीही पाळावे लागणार निर्बंध
कोरोना रुग्णसंख्या घटली आहे. मात्र तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच डेल्टाचाही धोका कायम आहे. त्यामुळे शासनाने सण उत्सवावर निर्बंध घातले आहे. कोरोना संकट टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. फिजिकल डिस्टन्स, मास्क लावणे, हात वारंवार धुणे आदी करणे अत्यावश्यक आहे. असे केल्यास भविष्यातील कोरोना संकट टाळता येणे शक्य आहे.