रामदेवबाबाच्या योग प्रशिक्षणाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 11:00 PM2018-02-16T23:00:58+5:302018-02-16T23:01:23+5:30

जिल्ह्यात विकासाची गंगा आणणारे राज्याचे अर्थ, नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत योगाचे शिक्षण व प्रसार करण्यासाठी मूल येथे योगगुरु रामदेवबाबा यांना पाचारण केले आहे.

Preparations for Ramdev Baba Yoga | रामदेवबाबाच्या योग प्रशिक्षणाची तयारी

रामदेवबाबाच्या योग प्रशिक्षणाची तयारी

Next
ठळक मुद्देआरोग्याचा मंत्र देणार : सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : जिल्ह्यात विकासाची गंगा आणणारे राज्याचे अर्थ, नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत योगाचे शिक्षण व प्रसार करण्यासाठी मूल येथे योगगुरु रामदेवबाबा यांना पाचारण केले आहे. मंगळवार दि. २० फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या योग प्रशिक्षणासाठी रामदेवबाबा उपस्थित राहून योगाचे धडे देणार आहे. यादृष्टीने कर्मवीर महाविद्यालयाच्या परिसरात भव्य शामियाना उभारण्यात येत आहे. यासाठी भाजपाचे पदाधिकारी व पतंजली योग समितीचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहे.
तालुक्यातील प्रत्येक गावात प्रसिद्धी करीत आहेत. एकंदरीत संपूर्ण योग प्रशिक्षणाच्या तयारीच्या दृष्टीने ८ ते १० कार्यकर्त्यांच्या जवळपास २०० समित्या तयार करण्यात आलेल्या आहे. यासाठी हरिद्वार येथील पतंजली योगपीठाचे कार्यकर्ते मूल शहरात आश्रयाला आहेत.
ना. मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून तयार करण्यात आलेल्या पंडित दिनदयाल उपाध्याय इको पार्कच्या समोरील पटांगणावर योग प्रशिक्षणासाठी आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांची चारचाकी वाहने ठेवण्याच्या दृष्टीने पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर मागील बाजूला दोन चाकी वाहनाची पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे. नगरपालिका, पोलीस प्रशासनाकडून वारंवार प्रस्तावित योग प्रशिषण स्थळाला भेट देत आहेत. प्रशासनानेही यासाठी सक्रिय सहभाग घेतलेला दिसत आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या शिबिराचे आयोजन डॉ. शामाप्रसाद मुखर्जी वाचनालय व पतंजली सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे. पतंजली सेवा समितीचे शहराध्यक्ष प्रभाकर भोयर, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी वाचनालय मूल शहराचे अध्यक्ष अजय गोगुलवार यांच्या नेतृत्वात विविध समित्या गठित केलेल्या आहेत. सदर शिबिरात २१ फेब्रुवारी सकाळी ५ ते ७.३० पर्यंत योग शिकविल्या जाईल.
ना. मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात दारुबंदी करतानाच अनेक विकासकामांना वेग दिला. यात प्रामुख्याने जिल्ह्यातील बल्लारपूर, चंद्रपूर, मूल बसस्थानकाच्या नुतनीकरणासह माजी राष्टÑपती एपीजे अब्दुल कलाम गार्डन, इको गार्डन, ताडोबा अभयारण्यात आगरझरी येथे फुलपाखरु गार्डन, चंद्रपूर शहरात पिण्याच्या पाण्याची योजना, इरई नदीचे सौंदर्यीकरण, बांबू प्रशिक्षण केंद्रासह अनेक विकासकामांचा समावेश आहे. जिल्ह्यामध्ये असलेली वनौषधी लक्षात घेता शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा, यासाठी आता पतंजली योग केंद्राची मदत घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील लोकांचे आरोग्य सुधारावे. तसेच त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा या अनुषंगानेही हे आरोग्य शिबिर महत्त्वाचे आहे. या शिबिरासाठी श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय व पतंजली योग समिती परिश्रम घेतले जात आहे. जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, सभापती ब्रिजभूषण पाझारे, मनपा सभापती राहुल पावडे, महापौर अंजली घोटेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, प्रमोद कडू, संध्या गुरुनुले यांच्यासह हजारो कार्यकर्ते व्यवस्थेमध्ये आहेत.

Web Title: Preparations for Ramdev Baba Yoga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.