मुद्रांक विक्रेत्यांची संपाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 12:08 AM2017-10-04T00:08:37+5:302017-10-04T00:08:51+5:30
राज्य सरकारने दोन वर्षापूर्वी एक हजार रुपये आणि त्या पुढील मुद्रांकांची छपाई, वितरण तसेच विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला. शिवाय, ईएसबीटीआर प्रणाली बँकांकडे सोपविल्याने परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांना फटका बसला.
ब्रह्मपुरी : राज्य सरकारने दोन वर्षापूर्वी एक हजार रुपये आणि त्या पुढील मुद्रांकांची छपाई, वितरण तसेच विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला. शिवाय, ईएसबीटीआर प्रणाली बँकांकडे सोपविल्याने परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांना फटका बसला. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मुद्रांक विक्रेते ९ आॅक्टोबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
ईएसबीटीआर प्रणाली बँकांऐवजी मुद्रांक विक्रेत्यांमार्फतच राबवावी, या मागणीसाठी ३ हजार २०० मुद्रांक परवानाधारक तसेच १ हजार ३०० दस्तलेखकांनी संपात सहभागी होण्याचा निर्धार केला आहे, अशी माहिती मुद्रांक विक्रेता सुनील बनपूरकर यांनी दिली. सरकारने ३६ कोटी रुपयांचे एक ते दहा हजार रुपयांचे मुद्रांक छापून तयार ठेवले. मात्र, त्याचा वापर बंद करण्यात आला आहे. सद्या केवळ १०० ते ५०० संपात महाराष्ट्रातील सर्व मुद्रांक विक्रेते व अर्जदस्तलेखक अशा दोघांचाही समावेश राहणार असल्याने खरेदी विक्रीच्या व्यवहारासोबतच अन्य व्यवहार ही ठप्प होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुद्रांक विक्रेत्यांनी यापूर्वी अनेकदा संपाचे हत्यार उपसले होते. परिणामी, शासनाने संघटनेच्या पदाधिकाºयांशी चर्चा केली. मात्र, संबंधित मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची अद्याप पुर्ती झाली नाही.
त्यामुळे मुद्रांक विके्रत्यांवर अन्यायाची मालिका सुरूच आहे. या अन्यायाचा निषेध करण्यासाठी ९ आॅक्टोबरला संप पुकारण्यात आला आहे. या संपात ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्व मुद्रांक विक्रेते आणि दस्तलेखक सहभागी होणार आहेत.
साडेचार हजार मुद्रांक विक्रेते
ेराज्य शासनाच्या धोरणाविरुद्ध साडेचार हजार मुद्रांक विके्रेते या संपात सहभागी होणार आहेत. मुद्रांक विके्रत्यांना वेठीस धरणारे धोरण बंद करा, या मागणीसाठी राज्य संघटनेच्या आवाहनानुसार जिल्ह्यातही बंद पुकारण्यात आला होता. मात्र, शासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे संघटनेच्या नेतृत्वात बेमुदत आंदोलनाचे पाऊल उचलण्यात आले.