आजारमुक्तीसाठी प्रभावी आराखडा तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 11:03 PM2018-10-13T23:03:32+5:302018-10-13T23:03:52+5:30

जिल्हा १०० टक्के कुपोषणमुक्त व जलजन्य आजारमुक्त करण्यासाठी अधिकाºयांनी आराखडा तयार करावा, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. जिल्हा नियोजन भवनात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या बैठकीत गुरूवारी ते बोलत होते.

Prepare an effective plan for disadvantages | आजारमुक्तीसाठी प्रभावी आराखडा तयार करा

आजारमुक्तीसाठी प्रभावी आराखडा तयार करा

Next
ठळक मुद्देहंसराज अहीर : जिल्हा विकास समन्वय, सनियंत्रण बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा १०० टक्के कुपोषणमुक्त व जलजन्य आजारमुक्त करण्यासाठी अधिकाºयांनी आराखडा तयार करावा, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. जिल्हा नियोजन भवनात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या बैठकीत गुरूवारी ते बोलत होते.
यावेळी खासदार अशोक नेते, आमदार नाना शामकुळे, आमदार अ‍ॅड. संजय धोटे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जि. प. समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, महिला व बाल कल्याण सभापती गोदावरी केंद्रे, वित्त व बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक चंद्र्रकांत वाघमारे उपस्थित होते.
केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर म्हणाले, जिल्ह्यातील कुपोषणाची स्थिती आटोक्यात असली तरी पुरेशी नाही. जिल्हा १०० टक्के कुपोषणमुक्त कसा करता येईल, याचे नियोजन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी करावे. निधीची कमतरता नाही. प्रधानमंत्री खनिज विकास, सीएसआर, डीपीसीमधून विकास कामांकरिता भरपूर निधी उपलब्ध करून दिला आहे. हा निधी वेळेत खर्च करणे गरजेचे आहे. सर्व ग्रामपंचायतींना आरओ वॉटर एटीएममधून जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी पुरविण्यात येऊ शकते. त्यामुळे संपूर्ण जिल्हा जलजन्य आजाराने मुक्त होण्यास मदत होईल, अशा सूचनाही अधिकाºयांना दिल्या. रुग्णालयात औषधीच्या पुरवठ्यासाठी निधीची कमतरता नाही. प्रधानमंत्री खनिज विकासाच्या माध्यमातून निधी देता येऊ शकेल काय, याची पडताळणी करण्याच्या सूचनाही ना. अहीर यांनी जिल्हाधिकाºयांना केल्या. बचतगट, शेतकरी मेळावा व आरोग्य मेळाव्याचे आयोजन येत्या डिसेंबरच्या आत घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. पाटण, जिवती, वनसडी, खातोडा, बाळापूर येथील बँका शेतकºयांना सहकार्य करित नसल्याचे समितीचे सदस्य खुशाल बोंडे, महिला व बालकल्याण सभापती गोदावरी केंद्रे यांनी सांगितले. त्यावर जिल्हाधिकारी खेमणार यांनी सविस्तर अहवाल तयार करून संबंधित बॅकांच्या मुख्य कार्यालयाला पाठविण्याच्या सूचना ना.अहीर यांनी दिल्या. यावेळी समितीचे तुळशिराम श्रीरामे, जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती उपस्थित होते.

Web Title: Prepare an effective plan for disadvantages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.