अडचणीतील शेतजमिनीचा अहवाल तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 11:35 PM2018-07-16T23:35:23+5:302018-07-16T23:35:39+5:30

वेकोलि सास्ती एक्सपॉन्शन प्रकल्पामुळे कायमस्वरूपी पुराचा धोका निर्माण झालेल्या बाबापूर, कोलगाव, सास्ती गावांना संरक्षण देण्याकरिता नाल्यांचे खोलीकरण व रूंदीकरण करावे़ रस्त्याअभावी शेतीची कास्त करण्यास अशक्य झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करण्यासाठी वेकोलि मुख्यालयाकडे अहवाल सादर करावा, अशी सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली़

Prepare the report of the problem of farming in distress | अडचणीतील शेतजमिनीचा अहवाल तयार करा

अडचणीतील शेतजमिनीचा अहवाल तयार करा

Next
ठळक मुद्देहंसराज अहीर : वेकोलि अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: वेकोलि सास्ती एक्सपॉन्शन प्रकल्पामुळे कायमस्वरूपी पुराचा धोका निर्माण झालेल्या बाबापूर, कोलगाव, सास्ती गावांना संरक्षण देण्याकरिता नाल्यांचे खोलीकरण व रूंदीकरण करावे़ रस्त्याअभावी शेतीची कास्त करण्यास अशक्य झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करण्यासाठी वेकोलि मुख्यालयाकडे अहवाल सादर करावा, अशी सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली़
वेकोलि बल्लारपूर क्षेत्राच्या विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते़ यावेळी अरूण मस्की, किसान आघाडीचे राजू घरोटे, मधुकर नरड, तहसीलदार डॉ. रवींद्र होळी, क्षेत्रिय महाप्रबंधक बी.सी. सिंग, जि.प. सदस्य सुनील उरकुडे, बादल बेले, अ‍ॅड. प्रशांत घरोटे, पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, विस्तारक सतिश दांडगे, सचिन डोहे, बंडू बोढे, दिलीप गिरसावळे उपस्थित होते. सास्ती, कोलगाव, बाबापूर, मानोली येथील शेतकºयांनी ना. हंसराज अहीर यांची भेट घेवून वेकोलिच्या ओ. बी. डम्पमुळे शेतात मशागत करण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसल्याची तक्रार केली होती. तहसीलदारांनी या ठिकाणी रस्ता उपलब्ध करणे शक्य नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. यावेळी ना. अहीर यांनी वेकोलि व्यवस्थापनाने शेतकºयांच्या अडचणीची दखल घेतली़ शेतीची मशागत होत नसल्याने आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सेक्शन ४ नोटीफिकेशनकरिता अहवाल सादर करावा़ तसेच मुख्यालयाची मान्यता प्राप्त करून घ्यावी, असे निर्देश क्षेत्रिय महाप्रबंधकांना दिले. वाहिती करण्यास अडचण निर्माण झालेल्या सुमारे १०० एकर जमिनीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी. अधिग्रहणाशिवाय पर्याय नसताना वेकोलि व्यवस्थापन या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याने ना. अहीर यांनी यावेळी नापसंती व्यक्त केली. बैठकीमध्ये वेकोलि सास्ती वसाहतीतील समस्या प्रश्नांबाबत चर्चा झाली.

Web Title: Prepare the report of the problem of farming in distress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.