रोजगार व उत्पन्न वाढीसाठी अहवाल तयार करा
By Admin | Published: January 8, 2015 10:51 PM2015-01-08T22:51:38+5:302015-01-08T22:51:38+5:30
जिल्ह्याच्या उत्पादनात आणि रोजगारात वाढ केल्यास हा जि?हा सक्षम आणि संपन्न होईल. या जिल्ह्यात भौगोलि संसाधन आहेत. त्याचा पुरेपूर वापर विकासाठी व्हायला हवा. त्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी
चंद्रपूर : जिल्ह्याच्या उत्पादनात आणि रोजगारात वाढ केल्यास हा जि?हा सक्षम आणि संपन्न होईल. या जिल्ह्यात भौगोलि संसाधन आहेत. त्याचा पुरेपूर वापर विकासाठी व्हायला हवा. त्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी अहवाल तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री तथा वित्तमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी गुरूवारी जिल्हा वार्षिक योजना व पुढील पाच वषार्साठी विकास कामाचे नियोजन यासंबंधीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.
नव्या सरकाराच्या स्थापनेनंतर पहिली सभा गुरूवारी पार पडली. या सभेग्ला सर्वच जनप्रतिनिधी उपस्थित होते. हे औचित्य साधून जिल्हा नियोजन समितीच्या अद्ययावत सभागृहातचे उदघाटन यावेळी त्यांच्या हस्ते झाले.आमदार विजय वडेट्टीवार, नाना शामकुळे, आमदार डॉ.संजय धोटे, आमदार सुरेश धानोरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले, महापौर राखी कंचलार्वार, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक राजीव जैन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर व जिल्हा नियोजन अधिकारी एम.एम.सोनकुसरे यावेळी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी पुढील पाच वर्षाच्या विकास नियोजनाबाबत सूचना केल्या. विकास कामे करत असतांना गुणवत्तेमध्ये तडजोड न करता मुदतीत पूर्ण काम झाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बैठकीत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी व मनपा आयुक्त यांनी विकासकामांचे सादरीकरण केले. यावर बोलतांना पालकमंत्री म्हणाले, रस्ते प्रामुख्याने सिमेंटचे बनविण्यावर भर देण्यात यावा. चंद्रपूर फोर्टचा कृती आराखडा तयार करावा. मोठया प्रमाणात घरे तोडून चंद्रपूर बायपास बनविणे योग्य नसल्याने चंद्रपूर बायपासचा आराखडा तयार करावा. अनाधिकृत बांधकाम, खुल्या जागांचा विकास याबाबत जिल्हाधिका-यांनी लक्ष घालावे, असे त्यांनी म्हटले. (जिल्हा प्रतिनिधी)