चंद्रपुरात पावसाची हजेरी, इरई धरणाचे दोन दरवाजे उघडले

By राजेश भोजेकर | Published: September 13, 2023 03:24 PM2023-09-13T15:24:28+5:302023-09-13T15:26:31+5:30

नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याच्या सूचना

Presence of rain in Chandrapur, two gates of Irai dam opened | चंद्रपुरात पावसाची हजेरी, इरई धरणाचे दोन दरवाजे उघडले

चंद्रपुरात पावसाची हजेरी, इरई धरणाचे दोन दरवाजे उघडले

googlenewsNext

चंद्रपूर : शहरात रिमझिम पाऊस सुरू असून औष्णिक वीज केंद्राच्या इरई नदीवर बांधण्यात आलेल्या इरई धरणाची २ दारे उघडण्यात आली आहेत. धरण परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मंगळवारपासून या धरणाच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसत होती. यामुळे धरणाची दोन दारे अर्धा मीटरने उघडली.

सीटीपीएस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या गेट क्रमांक १ आणि ०.२५ मीटरने उघडण्यात आले आहेत. या धरणाची पाणीपातळी २०७.२५० मीटरवर गेल्यावर दरवाजे बंद करता येतील. जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस नसल्याने नागरिकांनी कशाचीही काळजी करण्याची गरज नाही, तरीही जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील इरई नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Web Title: Presence of rain in Chandrapur, two gates of Irai dam opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.